देवाण-घेवाणच्या त्रासातून तरूणांची आत्महत्या, एकावर गुन्हा दाखल

0
2

देवाण-घेवाणच्या वादातून एका तरूणांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याने खळबंळ उडाली आहे.उमदी(विठ्ठलवाडी) ता.जत येथे ही घटना घडली आहे. गणेश सिध्दाप्पा बागडी(वय ३५ रा.विठ्ठलवाडी उमदी)खोल विहिरीत उडी ‌टाकून आत्महत्या केली.आर्थिक देवाण-घेवाणच्या त्रासाला कंटाळून गणेशने आत्महत्या केली असल्याची फिर्याद ‌गणेशची आई अलका बागडे यांनी उमदी पोलीसात दिली आहे.

 

हेही वाचा-शाळेतून घरी येताना दोघे भाऊ शेततळ्याकडे गेले,दुर्देव्याने दोघांचाही बुडून मृत्यू,कुठे घडली घटना वाचा सविस्तर..

आत्महत्या नसून घातपात असल्याचा आरोप नातेवाईकांनी करत मृत्तदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.त्यामुळे पोलीस ठाण्याबाहेर काहीकाळ तणावाचे वातावरण होते.गणेशच्या आईच्या फिर्यादीनुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विठ्ठलवाडी उमदी येथे राहणारे वसंत होनमुखे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विठ्ठलवाडी येथील शेतकरी महादेव सिदराया सातपुते यांच्या जवळपास ८० फूट खोल बिना पायऱ्याची जूनी विहिरीमध्ये गणेशचा मृत्तदेह पडला असल्याची माहिती स्थानिकांना मिळाली. पोलीसांनी माहिती दिली.सा.पो.नि.पंकज पवार यांनी भेट दिली.मात्र विहिरी प्रचंड खोल व पायऱ्या नसल्याने मृत्तदेह बाहेर काढण्यास अडचणी येत होत्या.
पोलीसांनी सांगलीतील जीव रक्षक दलाच्या टिमला बोलविले.या टिमने गणेशचा मृत्तदेह विहिरीबाहेर काढला.जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृत्तदेह नातेवाईकांकडे देण्यात आला आहे.

हेही वाचा-आटपाडीत पिस्तूलसह तीन काडतुसे जप्त | स्कॉर्पिओसह,दोघांना अटक 

बागडी यांनी काहीकाळ पत्रकार म्हणूनही काम केले आहे.घटना कशी घडली यांचा तपास पोलीस करत आहेत. अधिक तपास उपनिरिक्षक एस.एस.शिंदे करत आहेत. सांगली स्पेशल रेस्क्यु टिमचे कैलास वडर,अमीर नदाफ,निहाल शेख,सुमित गायकवाड,बापू शेंडगे यांनी मोहिम राबविली.

 

हेही वाचा-

• फक्त हजार पासून पंचवीस हजार रूपये भांडवलात सुरू होणारे व्यवसाय | आजच सुरू करा स्व:चाचा व्यवसाय

नवी लावणी स्टार आली | सर्वांना देणार ‘फाईट’

विद्युतपंप चालू करायला गेलेल्या तरूण शेतकऱ्यांचा मृत्यू,वाचा कुठे घडली घटना..

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here