प्रसिद्ध लावणी स्टार गौतमी पाटीलचा कार्यक्रम आणि हुल्लडबाजी कायमचे चित्र झाले आहे.अतिउत्साही तरूणाकडून असे प्रकार सातत्याने घडताना दिसत आहेत.आताही सातारा येथील कार्यक्रमातही यांचा प्रत्यय आला आहे.गौतमी पाटील डान्स करत असताना
काही तरुणांनी हुल्लडबाजी केली.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत सौम्य लाठीचार्ज करत प्रसाद दिला.
सातारा -जावळीचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचा ३० मार्चला वाढदिवस साजरा होत आहे.
हेही वाचा-गौतमी पुन्हा आरोपाच्या फेऱ्यात,या प्रसिद्ध किर्तनकारांने केली टिका | गौतमीला तीन गाण्यासाठी ३ लाख,मात्र आम्ही ५ हजार मागितले तर होता आरोप
जावळी तालुक्यातील कुडाळ येथे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केला होता.आमदार शिवेंद्रराजे भोसले नियमित प्रवासासाठी वापरत असलेल्या एमएच ११ सीव्ही ११११ या गाडीची प्रतिकृती केक मध्ये वापरण्यात आली होती. यावेळी शिवेंद्रराजे यांनी पाच मुलींच्या हस्ते केक कापून आपला वाढदिवस साजरा केला. यावेळी मतदारसंघातील हजारो कार्यकर्ते, चाहते उपस्थित होते.
हेही वाचा- नवी लावणी स्टार आली | सर्वांना देणार ‘फाईट’
या कार्यक्रमाला जावळी तालुक्यातील कुडाळसह भागातील तरूण कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.यावेळी हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला.गौतमी पाटीलने कुडाळमधील कार्यक्रमात विविध गाण्यावर अदाकारी सादर केली. यावेळी तरुणाईने प्रतिसाद दिला. मात्र, कार्यक्रमावेळी संरक्षणासाठी स्टेजच्या समोर उभारलेल्या बॅरॅकेट तरुणांनी पाडून स्टेजजवळ येण्याचा प्रयत्न केला.