अडचणीत मदतीला आलेल्या बँकांची थकबाकी भरण्याची वेळ एक दिवसावर
जत : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही सर्वसामान्यांची बँक आहे.बँकेने शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले आहेत. बँकेच्या दहा तालुक्याचा एन.पी.ए. शंभर कोटी आहे. त्यामध्ये जत तालुक्याचा एन.पी.ए. ५२ कोटी आहे. हे खेदजनक असून तालुक्यातील सोसायटीचे अध्यक्ष व संचालक मंडळाने ३१ मार्चपूर्वी अधिकाधिक वसुली करावी, ओटीएस योजनेचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन सांगली जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश जमदाडे यांनी केले आहे.
दरम्यान, जत तालुक्यातील ८२ सोसायटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांना यासंदर्भात जिल्हा बँक संचालक जमदाडे यांनी पत्र पाठवून बँकेला वसुलीस सहकार्य करावे,सोसायटीची जास्तीत जास्त वसुली करावी, असे आवाहन केले आहे.
विना परवाना बेदाणा वॉशींग,रिपॅकींग सेंटर चालकांचे धाबे दणाणले, अन्नभेसळ विभागाकडून छापे वाचा सविस्तर एका क्लिकवर
या पत्रात संचालक जमदाडे यांनी म्हटले आहे की, ओटीएस योजनेची मुदत दि. ३१ मार्च २०२३ पर्यंत असून जास्तीत जास्त थकबाकीदार सभासदानी यांचा लाभ घ्यावा.केंद्र सरकार व राज्य सरकार यांचा व्याज माफीचा लाभ घ्यायचा असेल तर आपले पीक कर्ज दि.३१ मार्चपूर्वी नूतनीकरण करुन घ्यावे. संस्थेची वसुली ५० टक्के झाल्यास सर्वसामान्य शेतकऱ्यांना कोणतेही कर्ज प्रकरण मंजूर होणेस अडचण येत नाही,आपल्या संस्थेची वसुली ८० टक्के झाल्यास सर्वसामान्य शेतकरी सभासदास पीक कर्ज,सामान्य कर्ज व अन्य कर्ज मिळण्यास अडचण येत नाही. सरकारी योजनांची प्रकरणे मंजर होणेसाठी संस्थेची ५० टक्केपेक्षा अधिक असणे आवश्यक आहे.
म्हैसाळ योजनेचे पाणी जत पूर्व भागात खळखळू लागले सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा
त्यासाठी वसुली करुन या योजनेचा लाभ घेणे गरजेचे आहे.बँक स्थापनेपासून शेतकऱ्यांसाठी ओटीएस योजना प्रथमतः अंमलात आणली आहे. आतापर्यंत १ हजार ३१७ शेतकऱ्यांनी लाभ घेतला आहे. बँकेकडून ६.१० कोटी व्याज परतावा संस्थेला देण्यात आला आहे.तरी संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सदस्य यांनी थकबाकीदार सभासदांना योजनेचे महत्व पटवून देवून जास्तीत जास्त वसुली करुन बँकेतील योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन संचालक जमदाडे यांनी केले आहे.