विना परवाना बेदाणा वॉशींग,रिपॅकींग सेंटर चालकांचे धाबे दणाणले, अन्नभेसळ विभागाकडून छापे

0

सांगली : विना परवाना बेदाणा वॉशींग व रिपॅकींग सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाने जिल्हाभर छापे टाकत संशयास्पद बेदाणे,साहित्य जप्त केले आहेत. कुपवाड एमआयडीसी सांगली येथील विना परवाना व्यवसाय करणाऱ्या बेदाणा वॉशींग व रिपॅकींग सेंटरची तपासणी करून या सेंटरवर कारवाई करण्यात आली आहे,काही सेंटरना व्यवसाय थांबविण्याची नोटिस दिली आहे.अशी माहिती सहाय्यक आयुक्त (अन्न) नि. सु. मसारे यांनी माध्यमांना दिली.

 

शेतकऱ्यांच्यासाठी प्रधानमंत्री कृषी सिंचन अनुदान योजना व पात्रता येथे क्लिक करून वाचा सविस्तर

सांगली जिल्ह्यामध्ये सध्या द्राक्ष हंगाम जोरात सुरू आहे.मार्केटबरोबर उत्पादक बेदाणा निर्मिर्तीकडे वळत आहेत.सध्या बेदाणा उत्पादनाचा कालावधी असल्याने बरीच नविन बेदाणा वॉशींग व ‍रिपॅकींग सेंटर सुरू झाली आहेत. या पार्श्वभूमीवर अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती फावडे व श्री. स्वामी यांच्या पथकाने अशा सेंटरची तपासणी केली.त्यात कुपवाड एमआयडीसी सांगली येथील विजय संजय सावंत यांच्या मालकीच्या मे. ओमी सेल्स कॉर्पोरेशनरंजीत शिवाजी मुळीक यांच्या मालकीच्या मे. बाबा ड्राय फ्रुटस व अशोक चौगुले यांच्या मालकीच्या मे. चौगुले ट्रेडींग या तीन बेदाणा वॉशींग व रिपॅकींग सेंटरची तपासणी केली.या तपासणी दरम्यान या पेढ्यांना परवाना नसल्याचे व वॉशींग सेंटरमध्ये अस्वच्छता असल्याचे आढळले आहे.

प्रसिद्ध अभिनेत्रीने 25 व्या वर्षी गळपासाने संपविले जीवन सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मे. ओमी सेल्स कॉर्पोरेशन या पेढीमध्ये बेदाणा वॉशींग करीता डीटर्जेंट पावडर वारली जात असल्याचे आढळल्याने सदर पेढीमधून बेदाणा व डीटर्जेंट पावडर (अपमिश्रक) यांचे नमुने विश्लेषणाकरीता घेवून 7 लाख 67 हजार 210 रूपये किंमतीचा बेदाण्याचा उर्वरीत 4 हजार 513 कि.ग्रॅ. साठा जप्त केला आहे. मे. बाबा ड्राय फ्रुटस व मे. चौगुले ट्रेडींग या पेढ्यांमध्ये रिपॅकींग केल्या जात असलेल्या बेदाणा पॅकींग लेबलवरती अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत आवश्यक असलेला उत्पादनाचा / रपिॅकींगचा पत्तारिपॅकींग व मुदतबाह्य दिनांकन्युट्रीशनल माहितीबॅच नंबरपरवाना क्रमांक इत्यादी नमुद नसल्याने दोन्ही सेंटरना त्यांचा व्यवसाय थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे.

Rate Card

फक्त हजार पासून पंचवीस हजार रूपये भांडवलात सुरू होणारे व्यवसाय | आजच सुरू करा स्व:चाचा व्यवसाय सविस्तर माहितीसाठी येथे क्लिक करा

 

तसेच कुपवाड एमआयडीसी येथील मे. सांगली ट्रेडींग व श्री दत्त कोल्ड स्टोरेज या पेढ्यांची तपासणी केली. मे. सांगली ट्रेडींग कंपनी विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच विक्री करीता साठविलेल्या बेदाणा पॅकींग लेबलवरती आवश्यक मजकूर नसल्याचे आढळल्याने सदर पेढीस व्यवसाय बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे. श्री दत्त कोल्ड स्टोरेज ही पेढी देखील विना परवाना व्यवसाय करीत असल्याचे व मुदतबाह्य अन्न पदार्थांचा साठा साठविल्याचे आढळल्याने कीड लागलेली पेंडखजुर या अन्न पदार्थांचे 5 कि.ग्रॅ.चे 110 बॉक्स नष्ट करण्यात आले. या पेढीस व्यवसाय ‍थांबविण्याची नोटीस देण्यात आली आहे.

 

वाशिंग व रिपँकिंग सेंटर चालकाचे धाबे दणाणले

सध्या बेदाण्याचा हंगाम जोरात सुरू आहे.प्रतिबंधित केमिकल्स,डीटर्जेंट पावडर (अपमिश्रक) असे वापरून मनुष्यांना धोका होऊ शकणारा बेदाणा निर्माण केला जात आहे. त्याशिवायबेदाणा पॅकींग लेबलवरती अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत आवश्यक असलेला उत्पादनाचा / रपिॅकींगचा पत्ता, रिपॅकींग व मुदतबाह्य दिनांक, न्युट्रीशनल माहिती, बॅच नंबर, परवाना क्रमांक वापरला जात नाही,अशा सेंटरवर कारवाई होत असल्याने त्यांचे दाबे दणाणले आहे.

बेदाणा तयार झाल्याचे ठिकाण, त्याचा उत्पादनाचा कालावधी याबाबतची ग्राहकांना माहिती होण्याकरीता तसेच अन्न विषबाधा व अन्न पदार्थांच्या गुणवत्तेबाबत तक्रारीच्या घटनांमध्ये तपास करण्याकरीता लेबल वरील माहिती ही अत्यंत महत्वाची असते. सांगली जिल्हा बेदाणा उत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा असल्याने जिल्ह्यामधील बेदाण्याला राष्ट्रीय तसेच जागतिक पातळीवर ओळख निर्माण करण्याकरिता लेबल वरील मजकूर अत्यंत उपयुक्त आहे. त्यामुळे सर्व बेदाणा वॉशींग व रिपॅकींगचा व्यवसाय करणाऱ्या अन्न व्यवसायीकांनी अन्न सुरक्षा व मानके कायद्यांतर्गत परवाना घेतल्या शिवाय व्यवसाय करू नये,त्याचबरोबर बेदाणा पॅकींग लेबल वरती कायद्याने आवश्यक मजकुर नमुद करण्यात आला पाहिजे. बेदाणा वॉशींग करीता कायद्याने परवाना दिलेल्या घटकांशिवाय कोणत्याही केमिकल्सडिटर्जेंटचा वापर करणे कायद्याने गुन्हा होऊ शकतो.यापुढेही जिल्ह्यात सुरू असलेल्या विना परवाना बेदाणा वाशिंग व रिपँकिग सेंटरवरील मोहिम तीव्र करण्यात येणार आहे.पुढील काही दिवसात जास्तीत जास्त वॉशींग व रिपॅकींग सेंटरची तपासणी केली जाणार आहे.त्यासाठी पथके नेमण्यात येतील, ग्राहकांनी कोणतेही अन्न पदार्थ खरेदी करताना पदार्थावरील लेबल वरील मजकूर तपासूनच खरेदी करावाअसे आवाहन अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

हेही वाचा – रोजगार मेळावा 9 मार्चला

सांगली : खाजगी क्षेत्रात लहान, मध्यम व मोठ्या कारखान्यांना आवश्यक असणारे मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी व बेरोजगारीची समस्या दूर करण्याच्या दृष्टीकोनातून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन बुधवार 29 मार्च 2023 रोजी करण्यात आले आहे.उमेदवारानी www.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर अर्ज करून ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त ज.बा. करीम यांनी केले आहे.

   विहीर,पंपसंच,वीज जोडणी,ठिंबक,तुषार सिंचन,शेततळ्याचे प्लास्टिक यासाठी शासनाकडून मिळणार अनुदान सविस्तर माहितीसाठी येथे भेट द्या

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.