गेल्या महिन्यापासून तीव्र उन्हाच्या झळाने व्याकुळ झालेल्या जतकरांना काहीसा दिलासा मिळाला.गुरुवारी सायकाळपासून आकाश ढगांनी व्यापले हाेते, त्यामुळे सकाळपासून चटक्याऐवजी गारवा जाणवत हाेता. हवामान विभागाने किमान आठवडाभर म्हणजे १३ एप्रिलपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात विजा व गडगडाटासह अनेक भागात तुरळक किरकाेळ पावसाची शक्यता वर्तविली आहे.
भारताच्या दक्षिणेकडे दाेन उच्च दाबाचे क्षेत्र तयार झाले आहेत. उत्तर कर्नाटकाकडे तयार झालेले सायक्लाेनिक सर्क्युलेशन दक्षिण तमिळनाडूच्या वेल्लाेरपर्यंत सरकत असून याचा चक्राकार गतीचा आस तयार झाला आहे. वारा खंडितता प्रणालीद्वारे चक्राकार पद्धतीने चक्रीय वारे वाहत असून ते बंगालचा उपसागर व अरबी समुद्रातील आर्द्रता घेऊन वाहत आहेत.त्यामुळे महाराष्ट्रावर अवकाळीचे सावट पसरले आहे.पुढील पाच दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे.
पुढचे ७ व ८ एप्रिल असे दोन दिवस तुरळक ठिकाणी किरकाेळ पाऊस व गारपिटीचीही शक्यता आहे. मात्र, विजांचा कडकडाट व वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यामुळे नुकसान हाेण्याचीही शक्यता वर्तवली आहे.
दरम्यान, ढगाळ वातावरणामुळे नागपूरचे कमाल तापमान कमी झाले आहे.ढगाळ वातावरणामुळे पुढचे तीन दिवस कमाल व किमान तापमानात घसरण हाेण्याचा अंदाज आहे. त्यानंतर मात्र पारा वाढेल,उन्हाची तीव्रता घायाळ होऊ शकते, असा अंदाज व्यक्त होत आहे.
[contact-form][contact-field label=”Name” type=”name” required=”true” /][contact-field label=”Email” type=”email” required=”true” /][contact-field label=”Website” type=”url” /][contact-field label=”Message” type=”textarea” /][/contact-form]