जतमधिल या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणार मूत्रपिंडावरील आजारावर उपचार

0

मधुमेह आणि हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून,त्याचा परिणाम रुग्णांचे मूत्रपिंड निकामी होत आहे.अश्या रुग्णांना डायलेसिसचे उपचार घ्यावे लागते.

जत येथील “कमल ऑर्थोपेडीक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल” मध्ये डायलेसिस सेंटर चे उदघाटन श्रीमती कमल सनमडीकर यांच्याहस्ते करण्यात आले.जत तालुक्यामध्ये मधुमेह आणि हृदयरोगाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून,त्याचा परिणाम रुग्णांचे मूत्रपिंड निकामी होत आहे.

 

अश्या रुग्णांना डायलेसिसचे उपचार घ्यावे लागते.यासाठी रुग्णांना मिरज,सांगली,विजापूरला जावे लागत होते.यामुळे त्यांचा बराच वेळ आणि जास्त पैसाही खर्च होत होता.या गरीब रुग्णांना माफक दरामध्ये आपल्या जतमध्येच उपचार मिळावे यासाठी डायलेसिस सेंटरची सुरवात करण्यात आली.

 

गेली 24 वर्षे जत तालुक्यातील गोर गरिब रुग्णासाठी डॉ.कैलास सनमडीकर आणि डॉ.वैशाली सनमडीकर यांचे ‘कमल ऑर्थोपेडीक सेंटर अँड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’हे वरदान ठरत आहे.यामध्ये मेडिसिन विभाग,सी.टी.स्कॅन अँड डायग्नोस्टिक सेंटर,सोनोग्राफी,डेंटल एक्स.रे विभाग सुरू केले आहेत.त्याचबरोबर या रुग्णालयात प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जीवनदायी योजना सुरू करण्यात आली आहे.याद्वारे रुग्णांना मोफत व माफक दरात उपचार मिळत आहेत.

या दांपत्याची वैद्यकीय सेवाकार्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेऊन नॅशनल अक्रीडरेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल अँड हेल्थ केअर (NABH)या संस्थेतर्फे  ‘उत्कृष्ट सेवेचे प्रमाणपत्र’ ही हॉस्पिटलला देण्यात आले आहे.जत तालुक्यामध्ये NABH प्रमाणपत्र मिळवणारे हे पहिलेच हॉस्पिटल आहे.
यामुळे जत तालुक्यातील गोर-गरीब रुग्णांना अनेक वेगवेगळ्या रोगावर एकाच छताखाली उपचार मिळत आहेत.

 

या उदघाटन प्रसंगी हॉस्पिटल चे डॉ.कैलास सनमडीकर,डॉ.वैशाली सनमडीकर,डॉ.के प्रसाद,डॉ.रवी जानकर,डॉ.तेज कुलकर्णी तसेच हॉस्पिटल मधील सर्व स्टाफ उपस्थित होता.
जत येथील कमल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डायलेसिस सेंटरची सुरूवात करण्यात आली.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.