करजगीत प्राथमिक, उमदीत माध्यमिक कृषी पदविकेचे शिक्षण घेतलेला हा विद्यार्थी भारतात प्रथम

0
जतसारख्या दुर्लक्षीत तालुक्यातील मुले आता देशात नाव कमवत असून देश पातळीवरील स्पर्धा परिक्षेत तालुक्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी झेंडा लावला आहे.कायम दुष्काळ,शिक्षणांची हवी तशी सोय नसतानाही परिस्थितीशी दोन हात करत करजगी (ता.जत) येथील सदाशिव शिवशंकर मेडीदार या तरुणांने नुकत्याच झालेल्या बँकिंग क्षेत्रातील आयबीपीएस परीक्षेत मोठे यश मिळवले आहे.भारतात प्रथम क्रमांक मिळवत‌ गाव तालुक्याचे नाव उंचावले आहे.

जत येथील गणेश पतसंस्थेला १ कोटी ३४ लाख ढोबळ नफा 

बँकिंग क्षेत्रातील आयबीपीएसकडून रिझर्व बँकेच्या नियंत्रणाखाली विविध राष्ट्रीयकृत्त बँकातील अधिकारी पदासाठी हि परिक्षा घेतली जाते.ग्रामीण भागातील मुलांना मेडीदार यांच्या यशामुळे अपेक्षा वाढल्या आहेत.
जत तालुक्यात आता प्रगतीचे द्वारे खुली झाली आहेत.मात्र लोकसेवा आयोग व स्पर्धा परीक्षा अपवाद होत्या. गतवर्षी झालेल्या निकालात 2019 च्या झालेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतलेल्या परीक्षेत सहा तरुणांनी यश खेचून आणले होते.यात मेडीदार यांनी उज्वल यश संपादन केले आहे.मेडिदार यांची आयबीपीएस एग्रीकल्चर फिल्ड ऑफिसर या पदावर निवड झाली.सदाशिव मेडिदार हे भारतात प्रथम क्रंमाकांने उत्तीर्ण झाले आहेत.

 

जतमधिल या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये होणार मूत्रपिंडावरील आजारावर उपचार 

प्रथमपासून हुशार असलेल्या
सदाशिव यांनी स्पर्धा परिक्षाचा अभ्यासावर भर दिला होता.ऑनलाइन मार्गदर्शन मिळवत त्यांनी हि परिक्षा दिली. या परीक्षेत 76.27% गुण मिळवत राज्यातच नव्हे तर संपूर्ण भारतामध्येच प्रथम क्रमांक मिळवत सदाशिव मेडीदार यांनी टॉपरचा बहुमान मिळविला आहे.
Rate Card
सदाशिव मेडिदार यांचे माध्यमिक शिक्षण करजगीच्या परमपूज्य श्री सिद्धेश्वर स्वामीजी हायस्कूलमध्ये झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक शिक्षणासाठी त्यांने महात्मा विद्यामंदिर हायस्कूल व जुनिअर कॉलेज उमदी येथे शिक्षण घेतले. त्यानंतर कृषी पदविकेचे शिक्षण लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालय हिंगणगाव कडेगाव येथे पूर्ण केले आहे.बँकिंग परिक्षेसाठी सदाशिवला उमदी समतानगर येथील हणमंत शिवाप्पा लोणी यांचे मार्गदर्शन मिळाले.

जतचा नेत्रदिपक नजारा,ढगाची झालर,राष्ट्रीय महामार्गावरून घेतलेला ; एकदा पहाच.. 

शहरी भागासारखी सोय नसतानाही सदाशिवने करजगी येथील घरी बसूनच ऑनलाइनच्या मदतीने या परिक्षेचा अभ्यास केला होता.करजगीसारख्या सीमावर्ती गावातील सदाशिव मेडिदार यांचे यश तालुक्यातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या मुलांना प्रेरणादायी ठरणार आहे.वैभव लोणी, राजू लोणी, डॉ विनायक लोणी,सुरेखा लोणी  यांनी सदाशिव मेडीदार यांचा शाल,श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार केला.

जत मतदारसंघ विकास कामासाठी मोठा निधी मिळाला | या गावातील होणार विकास कामे

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.