या कॉलेजच्या दोन विद्यार्थ्याची रायफल शुटींग स्पर्धेसाठी निवड

0
4
अखिल भारतीय आंतर विद्यापीठ रायफल शुटींग स्पर्धेचे आयोजन स्वामी विवेकानंद सुभारती विद्यापीठातर्फे मेरठ( उत्तरप्रदेश ) येथे
करण्यात आले होते.या स्पर्धेमध्ये फॅबटेक कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च च्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थी स्वरूप सत्यवान वाघमारे (तृतीय वर्ष) व फॅबटेक कॉलेज ऑफ फार्मसी मधील स्वप्निल सत्यवान वाघमारे (तृतीय वर्ष) यांची निवड रायफल शुटींग स्पर्धेमध्ये झाली होती,अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.बी.शेंडगे यांनी दिली.

 

अनिल इंगवले यांना राज्यस्तरीय ;महाराष्ट्र गौरव ; पुरस्कार प्रदान

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर यांनी केले व पुढील कारकिर्दीस शुभेच्छा दिल्या.यावेळी मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.अमित रुपनर, कार्यकारी संचालक दिनेश रुपनर, कॅम्पस डायरेक्टर संजय अदाटे, पॉलिटेक्निकचे प्राचार्य शरद पवार,व कॉलेज ऑफ फार्मसी प्राचार्य डॉ एस.के.बैस, प्रा. टी.एन जगताप,व सर्व विभाग प्रमुख,प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना फिजिकल डायरेक्टर प्रा.प्रभाकर सुतार यांचे मार्गदर्शन लाभले.

शिवसेना नेते भाऊसाहेब रुपनर यांचे सांगोला मतदारसंघातील नागरिकांना विनम्र आवाहन

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here