मोबाईलमधिल सिमकार्डचा गैरवापर केल्यास…!

0
आगामी दूरसंचार विधेयकात बनावट सिम कार्डच्या समस्येला सामोरे जाण्यासाठी दूरसंचार विभाग (DoT) केवायसी मानदंडांमध्ये फेरबदल करण्याची योजना आखत आहे. यात मुख्यतः एकाच आयडीवर जारी केलेल्या सिमकार्डची संख्या सध्याच्या नऊवरून पाचवर आणणे, सिम कार्ड जारी करण्यासाठी संपूर्ण डिजिटली पडताळणी, सिमकार्डचा गैरवापर केल्यास दंड, सिमकार्डसाठी ग्राहकांनी दिलेली बनावट कागदपत्रे/ कागदपत्रांची पूर्तता यांचा समावेश असणार आहे.

व्वा रे, पट्ट्या | महादेवाला नवस बोलताना अशी आरोळी कधी ऐकला का | व्हिडिओ

नवीन KYC निकष सहा महिन्यांच्या आत आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि डिजिटल इंटेलिजेंस युनिट (AI आणि DIU) विभागाद्वारे एका राष्ट्रीय कार्यगटाशी सल्लामसलत करून अधिसूचित केले जाणार आहेत, ज्यामध्ये भारतीय रिझर्व्ह बँक (RBI), माहिती आणि तंत्रज्ञान मंत्रालयासह इतर सरकारी प्रतिनिधींचा समावेश असणार आहे.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.