तासगाव सूतगिरणीच्या कामगारांचे उपोषण सुरू | सूतगिरणी बंद काळातील 50 टक्के पगाराची मागणी 

0
तासगाव : स्व. आर. आर. पाटील यांनी उभारलेली स्वामी रामानंद भारती सूतगिरणी गेल्या वर्षभरापासून बंद आहे. त्यामुळे कामगारांची उपासमार होत आहे. परिणामी बंद काळातील 50 टक्के पगार मिळावा, या मागणीसाठी कामगारांनी आजपासून (शनिवार) सुतगिरणीच्या गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षात ही सूतगिरणी वारंवार बंद पडत आहे. स्व. आर.आर.पाटील यांच्या पश्चात ही संस्था सांभाळता येत‌ नसल्याचे चित्र आहे. त्यांना सूतगिरणी चालवण्यात सपशेल अपयश आले आहे.
 स्व. आर. आर. पाटील हे अनेक वर्षे आमदार, मंत्री राहिले होते. राज्याच्या राजकारणात त्यांचा दबदबा होता. मात्र त्यांना तालुक्यात, मतदारसंघात रोजगार निर्मिती करता आली नाही, हे कटू सत्य आहे. अनेक वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत त्यांनी फक्त सुतगीरणीची उभारणी केली. त्यांनी उभारलेले हे एकमेव सहकाराचे मंदिर आहे. आर. आर. पाटील हयात असताना त्यांनी ही सूतगिरणी सुरळीतपणे चालवली होती. सुमारे 200 कर्मचाऱ्यांना याठिकाणी रोजगाराची संधी उपलब्ध झाली होती.
गेल्या वर्षभरात कामगारांनी अनेकवेळा उंबरे झिजवले आहेत.मात्र सर्वांकडून केवळ आश्वासनाचे गाजर दाखवण्यात आले. प्रत्यक्षात आजपर्यंत सूतगिरणी सुरू झाली नाही. त्यामुळे कामगार संतप्त झाले आहेत. सुतगिरणीच्या पगारावर अनेकांचे कुटुंब चालते.मात्र संस्थेच्या संचालक मंडळाला कामगारांबद्दल कसलीच कणव नसल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, सूतगिरणी लवकर सुरू होण्याची चिन्हे दिसत नसल्याने जितके दिवस ही संस्था बंद आहे त्या काळातील अर्धा पगार द्यावा, या मागणीसाठी कामगार रस्त्यावर उतरले आहेत. सुतगिरणीच्या शेकडो कामगारांनी आजपासून गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार कामगारांनी केला आहे.
Rate Card
2019 मध्ये मागण्याचे पत्र न घेतल्याने यावेळी ते रजिस्टर केले : भरत पाटील
तासगाव सूतगिरणी अनेकवेळा बंद पडली आहे. बंद काळात कामगारांची उपासमार होते. 2019 मध्येही सूतगिरणी अनेक महिने बंद पडली होती. त्यावेळी कामगारांनी आर. आर. पाटील कुटुंबियांना मागण्यांचे निवेदन देण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांनी निवेदन स्वीकारले नाही. तसेच उपोषणही करू नका असे सांगितले होते. त्यामुळे यावेळी आमदार सुमन पाटील यांना प्रत्यक्षात निवेदन न देता ते रजिस्टर केले आहे, असे कामगारांचे नेते भरत पाटील यांनी सांगितले.

. खुशखबर आता होणार शेतकऱ्यांच्या पैशाची बचत

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.