अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ वैयक्तिक कर्ज मर्यादा वाढविली ; वाचा सविस्तर

0
12

सांगली : लाभार्थ्यांच्या हिताच्या ठिकाणी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ जातीने लक्ष देवून काम करेल. भविष्यात त्या त्या तालुक्यातील लोकांचे कर्ज प्रकरणांबाबतचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक समन्वयक नेमणूक करू. छोट्या-मोठ्या व्यवसायीकांना महामंडळाच्या योजनांचा लाभ देवून त्यांना त्यांच्या पायावर उभे करण्याचे काम करू. व्यवसायीकांच्या पाठीशी महामंडळ खंबीरपणे उभे आहे, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष (मंत्री दर्जा) नरेंद्र पाटील यांनी केले.

 व्वा रे, पट्ट्या | महादेवाला नवस बोलताना अशी आरोळी कधी ऐकला का | व्हिडिओ   

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभार्थी – बँक संवाद मेळावा धनंजय गार्डन हॉल, सांगली येथे संपन्न झाला. त्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार दिनकर पाटील, इस्लामपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील, सत्यजीत देशमुख, दिपक शिंदे, पृथ्वीराज पवार आदि मान्यवर उपस्थित होते.

    बैलगाडा शर्यती | बघा कशा घडतात करामती

श्री. नरेंद्र पाटील म्हणाले, महाराष्ट्रात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचे 60 हजार लाभार्थी असून विविध बँकांनी जवळपास 4 हजार 62 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. शासनाने 390 कोटींचा व्याज परतावा महामंडळाच्या लाभार्थ्यांना दिला आहे. कर्ज वाटपात सांगली जिल्ह्यातही चांगले काम झाले असून महामंडळाच्या माध्यमातून जवळपास 24 कोटींचा व्याज परतावा लाभार्थ्यांना दिला आहे. वैयक्तीक कर्ज व्याज परतावा योजनेची मर्यादा 10 लाखाहून 15 लाखापर्यंत वाढविण्यात आली असून व्याज परतावा कालावधी जास्तीत जास्त 7 वर्ष इतके आहे. सामान्य व्यवसाय करणाऱ्यांनाही कर्ज पुरवठा महामंडळाकडील योजनांमधून होतो. छोट्या उद्योगासाठी दोन लाखापर्यंतचे कर्ज प्रोजेक्ट रिपोर्ट विना मिळू शकते.

मोबाइल, टिव्हिमुळे संवाद हरविला | या गावांनी घेतला निर्णय आणि बनली ‌ती चळवळ

ट्रॅक्टर योजनाही लवकरच सुरू करणार आहोत. महामंडळाच्या लाभार्थ्यांना थेट मॅन्युफॅक्चरकडून विशेष सवलतीमध्ये ट्रॅक्टर मिळण्यासाठी मागणी केली असल्याचे ते म्हणाले. अडचणी अनेक आहेत पण त्यावर मात करण्याचे काम केले पाहिजे. लाभार्थ्यांनी विविध बँकाच्या स्टॉल्सला भेटी देवून त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

   उदमांजराची शिकार | भाटवाडी (ता.वाळवा) येथे टोळी वन विभागाच्या ताब्यात        

आमदार सुधीर गाडगीळ म्हणाले, बऱ्याच विद्यार्थ्यांची फी भरण्याची परिस्थिती नसते अशा विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी तसेच डीग्री घेतल्यानंतर पुढे काय करावे यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी व कौशल्य विकास प्रशिक्षणासाठी आवश्यक प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.

आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडील योजनांची कर्ज प्रकरणे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून मंजूर करण्यास सुरूवात केली असून 5 कोटी 52 लाखाची कर्ज प्रकरणे मंजूर करून वितरीत केली आहेत. महामंडळाच्या योजनांचा युवकांना लाभ देण्यासाठी तालुकानिहाय बँकेचे अधिकारी नेमून पाठपुरावा केला जाईल. ज्याप्रमाणे जिल्हा मध्यवर्ती बँक पीक कर्ज वितरणात अव्वल आहे त्याचप्रमाणे युवकांच्या बाबतीतही बँक चांगले काम करेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

मुलांच्या शिक्षणाची चिंता आता करूचं नका,LIC ने आणली भन्नाट योजना ! ‘असा’ होईल योजनेचा फायदा

 यावेळी उपस्थित विविध बँकांचे अधिकारी व प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन करताना कर्ज प्रकरणात प्रोजेक्ट रिपोर्ट महत्वाचा असल्याचे सांगितले.

• आमदाराची आई,तरीही ८० वर्षांच्या अम्मा जोरगेवार विकतात टोपल्या

• करजगीत प्राथमिक, उमदीत माध्यमिक कृषी पदविकेचे शिक्षण घेतलेला हा विद्यार्थी भारतात प्रथम

मुलांच्या शिक्षणाची चिंता आता करूचं नका,LIC ने आणली भन्नाट योजना ! ‘असा’ होईल योजनेचा फायदा

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here