आपल्या मालमत्ता खरेदी-विक्री प्रकारात साठेखत ही एक शासनाने पध्दत आणली आहे.एकादा व्यवहार काही दिवसांनी होणार असेल,अडचणी असतीलतर साठेखत पध्दत अवलंबला जातो.मालमत्ता हस्तांतरण कायदा, १८८२ कलम ५४ मध्ये साठेखताला ʻमालमत्तेच्या विक्रीची संविदाʼ असा संबोधले आहे. यान्वये, साठेखत हा स्थावर मिळकतीच्या विक्रीचा असा करार आहे.त्यामुळे काही प्रमाणात मालकी हक्क मालमत्ता खरेदी करणाराला मिळतो,असे म्हटले जाते.ताबा साठेखत बद्दलची सविस्तर माहिती आपण आज माहिती घेणार आहोत.त्यामुळे हा लेख अखेरपर्यंत वाचा आणि माहिती आवडल्यास सोशल मिडिया शेअर करा..
स्व:ताचा भावपूर्ण श्रद्धांजलीचा वॉटस्अपवर स्टेट्स,अन् गळफास घेत तरूणांची आत्महत्या
ताबे साठेखत किंवा ताबा साठेखत म्हणजे काय?, जेव्हा एकाद्या स्थावर मालमत्तेचा व्यवहार होतो. टायटल ट्रान्सफर होते. त्यानंतर सेलडीड केले जाते. सेलडीड केल्यानंतर त्या जमिनीचे टायटल त्या जमिनीचा मालकीहक्क एका माणसाकडून दुसऱ्या माणसाकडे बदलला जातो. पण जमिनीच्या व्यवहारांमध्ये नुसतं टायटल ट्रान्सफर करून चालत नाही, कारण टायटल ट्रान्सफर झालं म्हणजे मालकी हक्क ट्रान्सफर झाला असे नसते. खूप लोकांना हाच गैरसमज असतो की एखाद्या जमिनीचा आपण व्यवहार केला, त्याचे सेलडीड केले, खरेदीखत आपल्या नावाने झालं, आणि त्या जमिनीचा सातबारा आपल्या नावाने केला, म्हणजे आपण मालक बनलो,असा समज होतो. दोन पक्षांमध्ये मान्य झालेल्या अटींनुसार एखाद्या मिळकतीचा विक्री करार होतो. निव्वळ असा करार झाला म्हणजे साठेखत करून घेणार याचा संबंधित मिळकतीवर कोणताही अधिकार, हक्क, बोजा किंवा हितसंबंध निर्माण होत नाही, कारण साठेखत हा केवळ आणि केवळ एखादी मिळकत भविष्यात हस्तांतरीत करण्याचा इरादा घोषित करणारा करार असतो.
खरंतर तसं पाहायला गेलं तर हे खर आहे. एकदा तुमच्या नावाने सेलडीड रजिस्टर झाले, तुमच्या नावाने सातबारा झाला, तर तुम्ही मालक बनता. परंतु आपल्याकडे एवढं पुरेसं नाही. याला अजून एक दस्त आवश्यक असतो, किंवा अजून एक तुमच्याकडे डॉक्युमेंट असावे लागते. तो कायदेशीर कागद म्हणजे त्या जमिनीचा कायदेशीर ताबा तुमच्याकडे असल्याचा डाक्युमेंटरी पुरावा.बरेचदा किंवा बहुतांश सर्वच सेलडीड मध्ये सेलडीड करताना ‘ताबा’ याचा एक क्लॉज असतो.साठेखत हे, दुय्यम निबंधकाकडे, संबंधीत मिळकतीचे पूर्ण मुद्रांक शुल्क व नोंदणी शुल्क अदा करून नोंदणीकृत असावे हे कायदेशीरदृष्टीने फायदेशीर असते. अशा नोंदणीकृत साठे खताची नोंद महसूल दप्तरात ʻइतर हक्कʼ सदरी नोंदविता येते. साठेखत नोंदणीकृत असल्यास, पुढे खरेदीखत करतांना मुद्रांक व नोंदणी शुल्क अदा करावे लागत नाही.
घशात जळजळ होतेय, मग ‘हे’ उपाय करा..
सोयाबीन ऑईलचा मोठा साठा, खानापूरात दुध संकलन केंद्रावर अन्न-औषध प्रशासनाची कारवाई
चुकीच्या फोन कॉलच्या गैरसमजूतीतून 7 जणांना मारहाण केल्याप्रकरणी 7 जणावर गुन्हा दाखल