जत : पुढच्या २-३ वर्षात जत तालुक्यातील कोणतीच गावे पाण्यापासून वंचित राहणार नाहीत, हा शब्द तुम्हाला देतो.आणि त्यामुळेच आता विविध पिके आपल्याला घेता येणार आहेत.त्याचा सखोल अभ्यास करणारी आणि शेतकऱ्यांना बदलत्या हवामानानुसार योग्य मार्गदर्शन करणारी कमिटी महाविकास आघाडीच्या माध्यमातून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष,माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी केले.सांगली कृषि उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाविकास आघाडीच्या वसंतदादा शेतकरी विकास पॅनलच्या दरीकोनुर येथील पार पडलेल्या सभेप्रसंगी मार्गदर्शन करीत उमेदवार व कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला.
शोले स्टाईल आंदोलन महागात,पतीची न्यायालयीन कोठडीत रवानगी
यावेळी माजी मंत्री आ.विश्वजीत कदम,आ.विक्रम सावंत,जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील,संचालक सुरेश पाटील,अविनाश पाटील यांच्यासह सर्व उमेदवार, ग्रामपंचायत आणि सोसायटी गटातील मतदार तथा इतर मान्यवर उपस्थित होते.जयंत पाटील पुढे म्हणाले,काल ठरलेल्या या कार्यक्रमाला तुम्ही इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, यावरून तुमचा निर्णय पक्का असल्याची प्रचिती आली.आपल्या मार्केट कमिटीचा कारभार पारदर्शी झाला पाहिजे, भविष्यकाळात आपल्याकडे शेतमालावर प्रक्रिया करणारी यंत्रणा सुद्धा निर्माण झाली पाहिजे. अलीकडे केंद्र सरकारने मार्केट कमिटीच्या नियम, अटी बदलल्या आहेत. त्यामुळे सक्षम मार्केट कमिटी व्यवस्था मोडीत काढण्याचा प्रयत्न केला जात आहे.
आपल्या भागातील शेतकऱ्यांना समृध्द बनविणाऱ्या मार्केट कमिट्या टिकवायच्या असतील तर आपल्याला एक दिलाने महाविकास आघाडीने दिलेल्या पॅनलला निवडून आणायचे आहे,असे आवाहनही पाटील यांनी केेले.माजी मंत्री आ.विश्वजीत कदम म्हणाले,कोट्यवधींची उलाढाल असलेली सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती हा शेतकऱ्यांचा कणा आहे.जिल्ह्यातील मोठी सहकारी संस्था असून हळद, गूळ, बेदाणा यासाठीची सर्वात मोठी उलाढाल या बाजारपेठेत होत असते.सांगलीला अद्ययावत असे फळ मार्केट आवश्यक होते.मागच्या निवडणुकीच्यावेळी स्व.डॉ. पतंगराव कदम साहेबांनी अद्ययावत डाळींब मार्केट निर्माण करण्याची घोषणा केली होती.ती साहेबांची स्वप्नपूर्ती आ. विक्रम दादांच्या आणि तुमच्या सहकार्याने झाली आहे.
आज जत येथे कोट्यावधीची उलाढाल ठरणारे अद्यावत डाळींब मार्केट सुरु झाले आहे. उमदी येथे बाजार समितीसाठी नवीन जागा घेतली आहे. जत आणि माडग्याळचा जनावरांचा बाजार राज्यात प्रसिद्ध आहे. माडग्याळचा मेंढी बाजारसुद्धा जगप्रसिद्ध आहे,यापुढील काळातही आपल्या पॅनलच्या माध्यमातून सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी ठोस योजना राबविण्यात येतील,असेही आ.कदम म्हणाले.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामुळे तमाशा कलावंत अडचणीत
आमदार विक्रम सावंत म्हणाले,सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीतुन होत असलेली करोडोंची उलाढाल ही काही एका दिवसात जादू केली आणि सुरु झाली असे घडलेले नाही.यामागे अनेक नेत्यांनी कष्ट घेतले त्यामध्ये डॉ. पतंगराव कदम यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आज जत मध्ये साहेबांनी केलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कामामुळेच शेतकरी राजा आर्थिक दृष्ट्या संपन्न होतोय. त्यामुळे यापुढेही हे कार्य वसंतदादा शेतकरी विकास पॅनलमधील सर्व उमेदवार प्राणपणाने करतील असा विश्वास याप्रसंगी व्यक्त केला.