फॅबटेक उद्योग समुहाचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर यांचा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्काराने गौरव

0
सांगोला :- फॅबटेक एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन भाऊसाहेब रुपनर यांना सरपंच सेवा संघाकडून देण्यात येणारा सन २०२३ चा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य आयोजित ‘मान कर्तृत्वाचा..सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय २०२३ पुरस्कार जाहीर झाला होता.
सदर पुरस्काराचे वितरण रविवारी अहमदनगर येथे संपन्न झाला.हा राज्यस्तरीय समाजभुषण पुरस्कार सरपंच संघटना चळवळीचे नेते व पटोदाचे आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील व बाबासाहेब पावसे-पाटील यांच्याहस्ते भाऊसाहेब रुपनर यांना प्रदान करण्यात आला.यावेळी भास्करराव पेरे पाटील म्हणाले, उद्योजक भाऊसाहेब रुपनर यांच्या औद्योगिक,सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी भाऊसाहेब रुपनर म्हणाले,या समाजभूषण पुरस्कारमुळे नवी ऊर्जा मिळाली आहे,यापुढे माझे समाजिक कार्य निरंतर सुरू राहिल.सरपंच सेवा संघ महाराष्ट्रचे निलेश पावशे,अमोल शेवाळे,रवींद्र पावसे,रोहित  पवार,देविदास फापाळे यांच्यासह राज्य कमिटीचे सदस्य, महाराष्ट्रातून वेगवेगळ्या गावातून आलेले आदर्श सरपंच उपस्थित होते. फॅबटेक सिटी स्कॅनचे संचालक डॉ.सुरज रुपनर, फॅबटेक टेक्निकल कॅम्पसचे डायरेक्टर संजय आदाटे, फॅबटेक पॉलिटेक्निकचे प्राचार्य शरद पवार, फॅबटेक फार्मसीचे प्राचार्य.डॉ.संजय बैस,प्रशासन अधिकारी राजेंद्र पाटील,फॅबटेक मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेचे मॅनेजर दिपक बेंद्रे,प्रा.अमोल पोरे,आकाश पुजारी आदी मान्यवर उपस्थित होते.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.