जिल्ह्याच्या क्षितीजावर नव्या युवक नेत्याचा उदय

0
दुष्काळी जत तालुका तसा कायम दुर्लक्षितचं,तालुक्यातील एक आजमाअमर झालेले ऐतिहासिक, संस्थानकालिन गाव डफळापूर या गावाला सुनिल(बापू)चव्हाण या नावाने लौकिक मिळवून दिला.जिल्ह्यात चर्चेत असणारे नाव,तालुक्यात मोठ काम असलेले बापू एक ताकतवान नेते होते.

डफळापूरमधिल श्री.बुवानंद पिराचा ऊरूस १७ मे पासून

तालुक्यातील राजकारणात बोटावर मोजण्या ऐवढे राजकारणी होते,त्यापैंकी एक नेते म्हणजे सुनिल(बापू) चव्हाण हे होतं.जत तालुक्यातील राजकीय ताकतीशिवाय जिल्ह्याचे राजकारण  हालले नाही,यांच तालुक्यात दहा वर्षापुर्वी एक नाव जिल्ह्यात गाजायचे ते म्हणजे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे उपाध्यक्ष सुनिल(बापू)चव्हाण..,मात्र नियतीने एका आकस्मिक घटनेने बापूचे निधन झाले.त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी त्यांचे चिरजिंव दिग्विजय चव्हाण या नव्या युवा पुढे आला.
Rate Card
प्रथम पंचायत समिती,सोसायटी,ग्रामपंचायत अशी सत्ता घेत तालुक्यात बापूचे कार्य सुरू ठेवले आहे.नुकत्याच बाजार समिती निवडणूक दिग्विजय चव्हाण यांनी लढविली.ऐनवेळी भाजपा पँनेलमधून निवडणूक लढवूनही त्यांनी पँनेलमधिल उमेदवारापेक्षा जादा मतदान घेतले आहे.तब्बल १०६२ मते मिळवून भविष्यातील चुणूक दाखविली आहे.या निवडणूकीतून जिल्ह्यात नव्या दिग्विजय चव्हाण या युवा नेत्याचा उदय झाला असून दिग्विजय भविष्यात जत तालुक्यासह जिल्ह्यातील राजकारणातील चर्चेत चेहरा असणार एवढे मात्र नक्की आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.