आयपीएलवर बेटींग घेणाऱ्या टोळीला सांगलीत पकडले,चौघे ताब्यात
सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणित आयपीएलवर बेटींग लावले जात असल्याच्या माहितीच्या आधारे पोलीसांनी कुपवाड परिसरात छापा टाकत चौघाना ताब्यात घेत मोबाईल, लॅपटाॅप, वाहनासह २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून आयपीएलच्या क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर बेटींग घेणाऱ्या टोळीला दणका दिला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई आहे.या टोळीतील चार बुकींना पोलीसांनी जेरबंद केले आहे.



यावेळी चौघेजण लॅपटाॅप, मोबाईलच्या सहाय्याने बेटींग घेत असल्याचे पथकांच्या निदर्शनास आले.तेथील बुकी विश्वनाथ खांडेकरसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.खांडेकर याची चौकशी केली असता क्रिकेट लाईव्ह गुरू नावाचे ॲपद्वारे बेटींग घेत असून धावासाठी एक रुपयाला एक रुपया तर हार जीतवर वाढीव भावाने पैसे असल्याचे पोलीसांना त्यांनी सांगितले. पोलिसांनी मोबाईल, लॅपटाॅप, वही, पेन व दुचाकी वाहने असा २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करत या चौघांवर कुपवाड एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
सांगली व इस्लामपूर बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा