कवठेमहांकाळमध्ये सव्वा कोटीचा गुटखा पकडला | एलसीबीची मोठी कारवाई
कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेली सुगंधी तंबाखू आणि गुटखा तसेच त्याची वाहतूक करणारे दोन ट्रक असा सुमारे सव्वा कोटींचा मुद्देमाल पोलीसांनी ताब्यात घेत तिघांना कर्नाटक येथून अटक करण्यात आली आहे.तिपुराया संगाप्पा बमनोळी (वय २६, रा.करजगी, ता. जत), बसवेश्वर टोपण्णा कदीमनी (वय २६, रा. करजगी, ता. जत),श्रीशैल तमराया हळके (वय ३०, रा. लहान उमदी, ता. जत) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सांगलीच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केली असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख सतीश शिंदे यांनी दिली.कर्नाटक विधानसभा निवडणूकीच्या तपासणी पथके तैनात करण्यात आली आहेत.एलसीबीचे सहायक निरीक्षक प्रशांत निशानदार यांचे एक विशेष पथक कवठेमहाकांळ तालुक्यात तपासणी करत होते.
पथकाला कवठेमहांकाळ येथून गुटखा घेऊन दोन ट्रक कर्नाटकात जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून मिळालेल्या माहितीप्रमाणे दोन ट्रकची तपासणी केली.त्यावेळी त्यामध्ये सुगंधी तंबाखू, तसेच गुटखा सापडला.

यावेळी तो घेऊन जाणाऱ्यां तिघांना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्याकडून दोन ट्रक (क्र. एमएच ०४ ईडी ०४८१, एमएच १२ आरएन ३२०३ ) जप्त करण्यात आले.विविध कंपन्यांची सुगंधी तंबाखू, गुटखा असा सुमारे सव्वा कोटींहून जादा मुद्देमाल जप्त केला आहे.ताब्यात घेतलेल्या संशयित तिघांसह मुद्देमाल कवठेमहांकाळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
कर्नाटक येथील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सीमाभागात कडक नाकेबंदी,गस्त घालण्याचे आदेश कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिले
आहेत.त्यानुसार सांगलीचे पोलिस
अधीक्षक डॉ.बसवराज तेली यांनी सीमाभागात कडक तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.त्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे.
एलसीबीचे पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सा.पो.नि.प्रशांत निशानदार,जितेंद्र जाधव,दिपक गायकवाड,सचिन धोत्रे,संदिप नलवडे,यांच्यासह अन्नसुरक्षा अधिकारी दत्तात्रय कोळी यांच्या पथकांने हि कारवाई केली.