सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणित आयपीएलवर बेटींग लावले जात असल्याच्या माहितीच्या आधारे पोलीसांनी कुपवाड परिसरात छापा टाकत चौघाना ताब्यात घेत मोबाईल, लॅपटाॅप, वाहनासह २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त केला असून आयपीएलच्या क्रिकेट स्पर्धेतील सामन्यावर बेटींग घेणाऱ्या टोळीला दणका दिला आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ही कारवाई आहे.या टोळीतील चार बुकींना पोलीसांनी जेरबंद केले आहे.
याप्रकरणी विश्वनाथ संजय खांडेकर (वय २२, रा. गंगानगर रोड वारणाली), रतन सिद्धू बनसोडे (२७, रा. अलिशान काॅलनी, कुपवाड), गणेश मल्लाप्पा कोळी (२१, रा. झेडपी काॅलनी, वारणाली), संतोष सुरेश घाडगे (१९, रा. महावीरनगर, विश्रामबाग) अशी अटक केलेल्या संशयित बुंकीची नावे आहेत. या टोळीकडून गेल्या अनेक दिवसापासून हा प्रकार सुरू होता.या टोळीकडून तब्बल ९ मोबाईल, चार दुचाकी, एक लॅपटाॅप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिस अधिक्षक डाॅ बसवराज तेली यांनी आयपीएल सामन्यावर बेटिंग घेणाऱ्याविरोध कारवाईचे आदेश दिले होते.पोलिस निरीक्षक सतीश शिंदे यांनी यावरील कारवाईसाठी पथक नेमले होते. पथकातील कर्मचारी दीपक गायकवाड व प्रशांत माळी यांना सांगली शहरालगतच्या कुपवाड ते वाघमोडेनगर रस्त्यालगत एका शेडमध्ये क्रिकेट सामन्यावर बेटींग घेतले जात असल्याची खबर मिळाली होती.आज होत असलेल्या लखनऊ व बेंगलोर या संघातील सामन्यासाठी बेटींग सुरू असल्याचेही सांगण्यात आले होते.त्या माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुपवाड नजिकच्या शेतातील शेडमध्ये छापा टाकला.
यावेळी चौघेजण लॅपटाॅप, मोबाईलच्या सहाय्याने बेटींग घेत असल्याचे पथकांच्या निदर्शनास आले.तेथील बुकी विश्वनाथ खांडेकरसह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.खांडेकर याची चौकशी केली असता क्रिकेट लाईव्ह गुरू नावाचे ॲपद्वारे बेटींग घेत असून धावासाठी एक रुपयाला एक रुपया तर हार जीतवर वाढीव भावाने पैसे असल्याचे पोलीसांना त्यांनी सांगितले. पोलिसांनी मोबाईल, लॅपटाॅप, वही, पेन व दुचाकी वाहने असा २ लाख ८० हजाराचा मुद्देमाल जप्त करत या चौघांवर कुपवाड एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे.
सांगली व इस्लामपूर बाजार समितीवर महाविकास आघाडीचा झेंडा
या कारवाईमुळे बेटींग बुकी हादरले आहेत.सशयिंत बुकी विश्वनाथ खांडेकर याच्याकडून पोलिसांनी एक डायरी जप्त केली असून डायरीत बेटींग खेळणारे व खेळविणाऱ्या २३ जणांची नावे व मोबाईल नंबर आहेत. त्या संशयित २३ जणांचा शोध पोलिसांकडून सुरू असल्याचे तपास अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.