सांगली जिल्ह्यात 11940 नविन विज जोडण्या

0
पुणे : महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयांतर्गत येणाऱ्या सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा व पुणे जिल्ह्यात आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये एकूण 61378 शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना नवीन विज जोडण्या देण्यात आलेल्या असून मागेल त्याला लवकरच वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आलेले आहे.

 जतमध्ये हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ‘आपला दवाखाना’ सुरू

प्राप्त माहितीनुसार पुणे प्रादेशिक विभागातील कृषिपंपाच्या नवीन वीज जोडणीत सोलापूर जिल्हा आघाडीवर असून मागील आर्थिक वर्षात एकूण 18740 जोडण्या देण्यात आल्या.पुणे जिल्ह्यात 13355 कृषिपंपाला नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या असून सांगली जिल्ह्यात 11940 जोडण्या, सातारा जिल्ह्यात 10408 जोडण्या व कोल्हापूर जिल्ह्यात 6935 नवीन जोडण्या देण्यात आलेल्या आहेत.

चोरी झालेले १२ मोबाइल मुळ मालकांना परत 

Rate Card
महावितरणने मागेल त्या शेतकऱ्याला लवकरच वीज जोडणी देण्याचे उद्दिष्ट ठरविले असून शेतकऱ्यांनी नवीन वीज जोडणीचा रीतसर अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. आकोडे टाकून अनधिकृत वीज वापर करू नये. जर केल्यास विद्युत अधिनियम 2003 च्या कलम 135 नुसार कारवाई करण्यात येईल. तेंव्हा याची खबरदारी घ्यावी.

बुडणाऱ्या पुतणीला वाचवताना काकांसह दोघंही बुडाले; कवठेमहांकाळ तालुक्यातील घटना  

नवीन कृषिपंप वीज धोरण 2020 नुसार शेतकऱ्यांना नवीन वीज जोडण्या देण्यासाठी कृषी आकस्मिक निधीचा वापर करण्यात आलेला आहे. तसेच यातून पायाभूत सुविधांची निर्मिती करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी भरलेल्या वीज बिलाच्या रकमेचा वापर करून मागेल त्याला लवकरच वीज जोडण्या देण्यात येत असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या थकीत व चालू बिलाचा भरणा करावा, असे आवाहन पुणे प्रादेशिक विभागाचे संचालक अंकुश नाळे यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.