अथणीत काट्याची टक्कर | माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदींचे भाजपला ओपन चँलेज
जत : ऐनवेळी भाजपचे स्टार नेते असलेले माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हाताच्या चिन्ह घेऊन मैदानात उतरले आहेत.भाजपाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याने त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.त्यामुळे अख्ख्या कर्नाटकातील भाजपच्या निशाण्यावर असलेला अथणी मतदार संघात काट्याची लढत होत आहे.
बेळगाव जिल्ह्यात विधानसभेचे तब्बल १८ विधानसभा मतदारसंघ आहेत.जिल्हा विस्ताराने खूप मोठा आहे. अथणीपासून बेळगावचे अंतर १५० किलोमीटर आहे.
बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्याची मागणी अनेक वर्षापासून आहे. परंतु राजकारणात हे घोंगडे भिजत पडले आहे. निवडणुकीच्या निमित्ताने तो मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.अथणी मतदारसंघाचे जवळच्या सांगलीशी बाजारपेठ, पै-पाहुणे या माध्यमातून जिव्हाळ्याचे संबंध आहेत.अथणीकरांचा सांगलीशी मोठा संपर्क असतो.