वळसंगमध्ये रविवारी 11 पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद,तालुक्यातील रुग्णसंख्येत किंचित वाढ

0जत,संकेत टाइम्स : जत‌ तालुक्यात कोरोना प्रभाव अद्याप कायम असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सर्व दुकाने उघडण्यात येत आहेत. मात्र त्यांना दिलेल्या नियमाचे सर्रास उल्लंघन होत असल्याने कोरोना संसर्ग वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.


रविवारी पुन्हा कोरोनाचे 44 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नव्या रुग्णात ग्रामीण भागातील 14 गावात 37  नवे रुग्णांची रुग्णांची नोंद झाली आहे.

Rate Card

दुसरीकडे नव्याच्या दुप्पट 89 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.रविवारी एकाही रुग्णाचा मुत्यू झालेला नाही.815 रुग्णावर सध्या उपचार सुरू आहेत.

वळसंग 11,निगडी खु 3,रामपूर 2,बिरनाळ 2,अचनहळ्ळी 1,पाच्छापूर 1,करेवाडी को 1,बिळूर 2,मेंढिगीरी 1,दरिबडची 4,उटगी‌ 2,कोसारी 5,कुंभारी 1,वाळेखिंडी 1 असे नव्या रुग्णांची नोंद झाली आहे.Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.