एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांमुळे गडचिरोलीच्या जांभळांची दसपट दरात विक्री

0



जांभूळ उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा माननीय एकनाथ शिंदे ह्यांचा निर्धार


१० रुपये किलो ऐवजी १०० रुपये किलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

गडचिरोली जिल्ह्याला सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्याचा निर्धार 







मुंबई : गडचिरोलीतील कोरची तालुक्यातील जांभळाला नागपूर सारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी नागपूर मध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऑनलाईन उपस्थितीत जांभूळ विक्रीला प्रारंभ करण्यात आला. त्यामुळे आज पहिल्याच दिवशी गडचिरोलीच्या जांभळांना दसपट किंमत मिळाली. जांभूळ विक्रीतून आदिवासी शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळेल व त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.


यावेळी गडचिरोलीचे  जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे व इतर मान्यवर उपस्थित होते.


Rate Card

मंत्री शिंदे म्हणाले की, गडचिरोलीतील कोरची सारख्या अतिदुर्गम भागात सुमारे ७६ टक्के लोक शेती हा व्यवसाय करतात. या निर्णयाचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना होईल यासाठी कृषी विभागाने त्यांना आवश्यक ती सर्व मदत करणे गरजेचे आहे. जांभूळ खराब होणार नाही यासाठी मदत करण्याची सूचना शिंदे यांनी कृषी अधिक्षकांना केली. जांभूळ उत्पादक शेतकरी महिलेने यावेळी शिंदे यांच्याशी संवाद साधला. १० रुपये किलो ऐवजी थेट १०० रुपये दराने जांभूळ विक्री होत असल्याने त्यांनी शिंदे यांचे आभार मानले.


शेतकऱ्यांना आणखी प्रोत्साहन द्यावे, त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत करावी व गडचिरोलीत स्ट्रॉबेरी, हळद व ड्रॅगन फ्रुट उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी कृषी अधिक्षकांना दिले. गडचिरोली जिल्हा सेंद्रीय शेतीचा जिल्हा म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याची सूचना शिंदे यांनी केली.


कोरची येथील जांभळाला उत्तम दर प्राप्त व्हावा आणि हातावर पोट असलेला आदिवासी शेतकरी आर्थिकदृष्ट्या अधिक सबळ आणि सक्षम बनावा यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे कसोशीने प्रयत्न करत होते. त्यांच्या संकल्पनेतून कोरचीतील जांभूळ विक्री नागपूर सारख्या महानगरात करण्याचा विचार पुढे आला आणि कोरोचीतील जांभळास अधिकाधिक प्रसिद्धी मिळू लागली. आतापर्यंत व्यापारी १० रुपये किलो दराने जांभळाची खरेदी उत्पादक शेतकऱ्यांकडून करत होते. मात्र आता महिला बचत गटांच्या माध्यमातून याच जांभळाची खरेदी १०० रुपये किलो दराने केली जात आहे.  त्यामुळे उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल. या सर्वात महिला बचत गटांनी दाखवलेला पुढाकार प्रशंसनात्मक ठरला आहे.

कोरची तालुक्यातील जांभळाची विक्री सध्या चंद्रपूर, नागपूर, वडसा, ब्रम्हपुरी, छत्तीसगड राज्यातील रायपूर, राजनांदगाव, भिलाई, दुर्ग येथील व्यापारी करत होते. त्यात व्यापारी वर्गाचा  आर्थिक लाभ होत होता, परंतु स्वतः कष्ट करून जांभळाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र ह्या जांभूळ विक्रीचा पुरेस मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे अशा उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा माननीय एकनाथ शिंदे ह्यांनी निर्धार केला व आज तो निर्धार पूर्णत्वास नेला.  

एकनाथ शिंदे ह्यांच्या ह्या संकल्पनेमुळे आता उत्पादक शेतकरी त्याने उत्पादित केलेल्या जांभळाची विक्री थेट बाजारात करू शकेल, ज्यामुळे शेतकरी उत्पादक कंपनी तयार होण्यास मदत होईल. जांभळाचे योग्य प्रकारे मूल्यवर्धन व्हावे ह्यासाठी जांभळाची शास्त्रीय पध्दतीने पॅकिंग करण्यात येईल. महिला बचत गटांच्या माध्यमातून थेट उत्पादक शेतकऱ्यांकडून जांभूळ खरेदी करण्यात येणार असल्याने उत्पादक शेतकऱ्यांचा आर्थिक लाभ तर होईलच पण त्याचसोबत महिला बचत गटातील सदस्यांना देखील चांगले उत्पन्न मिळेल.

मधुमेह, अस्थमा, ह्रद्यरोग, पोटाचे आजार, कर्करोग यासारख्या विविध आजारांवर जांभूळ गुणकारी आहे. जांभळामध्ये ग्लुकोज व फुक्टोज, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सोडिअम, विटामीन सी, थायमीन, रायबोफलेवीन, नियासीन, विटामीन बी ६, फॉलिक अॅसिड, प्रोटिन व कॅरोटीन सारखे घटक असल्याने त्याचा बहुविध कारणांसाठी वापर केला जातो.

जंगलातील जांभूळ गोळा करण्यापासून ते जांभळाचे मूल्यवर्धन करून बाजारात विकेपर्यंतच्या प्रक्रियेत समावेश असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने एकत्र येऊन मोठ्या बाजारपेठांमध्ये जांभूळ विक्री महोत्सवाचे आयोजन केल्यास ह्या व्यवसायला गती मिळेल अशा विश्वास एकनाथ शिंदे ह्यांनी व्यक्त केला.


गडचिरोलीतील कोरची सारख्या दुर्गम भागात उत्पादित होणारा सेंद्रीय जांभूळ आता उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याद्वारे मोठ्या बाजारपेठेत विक्रीस येणार आहे. अर्थातच ह्या विक्रीचा सर्वात मोठा आर्थिक लाभ कोरची मधील जांभूळ उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे व मोठ्या प्रमाणात त्यांना रोजगाराची संधी देखील उपलब्ध होणार आहे. महिला बचत गट जांभूळ १०० रुपये किलो प्रमाणे विकत घेणार असल्याच्या निर्णयामुळे उत्पादकांचा लाभ तर होणारच आहे शिवाय महिला बचत गटाच्या सदस्यांना देखील आर्थिक दृष्ट्र्या सक्षम होण्यास मदत मिळणार आहे. राज्य सरकार कडून आवश्यक ते सहकार्य देखील ह्या जांभूळ विक्री व्यवसायास मिळेल. हातावर पोट असलेल्या आदिवासी शेतकऱ्यांच्या जांभूळ उत्पादनाच्या मेहनतीला आता महानगरांमध्ये वाव मिळणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.