जत‌ तालुक्यातील ‘या’ सहा गावांना मिळणार लवकरचं म्हैसाळचे पाणी

0
5

मायथळ कालव्यामधून चर खोदण्यास सुरुवात

प्रकाशराव जमदाडे यांचे प्रयत्न यशस्वी ; माडग्याळसह सहा गावांना होणार लाभ
जत : गेल्या तीन वर्षापासून मायथळ कालव्यातून चर खुदाई करून माडग्याळ ओढ्यात पाणी सोडावे,म्हणून जिल्हा बँकेचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.अखेर कृष्णा खोरे महामंडळाच्या यांत्रिकी विभागाची मशनरी दाखल होत मायथळ कालव्यातून चर खुदाईचे काम सुरू केले आहे.या कॅनॉलमुळे सहा गावातील पाणी प्रश्न मिटणार आहे,तसेच दोड्डनाला तलावात पाणी सोडणे शक्य होणार आहे.शासकीय मशनरीने खुदाईची सुरूवात शेतकऱ्यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी माडग्याळ परिसरातील शेतकऱ्यानी जमदाडे यांचा सत्कार करण्यात आला व त्यांचे आभार मानले.
यावेळी म्हैसाळ योजनेचे उपअभियंता जाधव, उपअभियंता गणेश खरमाटे , प्रफुल्ल वाघमारे,दळवी ज्येष्ठ शेतकरी नंद्यापा माळी ,बाबासाहेब जाधव, विठ्ठल निकम, सोमाणा हाक्के,परसराम बंडगर,संभाजी सावंत,अमरीश माळी ,सुनील घाटगे,सरपंच महादेव माळी,प्रमोद सावंत, यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
मायथळ कालव्यामधून चर खोदून माडग्याळ ओढ्यात पाणी सोडल्यास जतच्या पूर्व भागात पाणी जावू शकते.या कालव्यापासून अडीच किलोमीटरचा फाटा काढून तो नैसर्गिक प्रवाहात सोडल्यास अगदी कमी खर्चात पूर्व भागातील दोड्डनाला माध्यम प्रकल्प भरला जाणार आहे.तसेच माडग्याळ, कुलाळवाडी , सोन्याळ, उटगी,निगडी बु,उमदी या गावांना लाभ होणार आहे. शेतीचा व पाणी प्रश्नही सूटणार आहे .जिल्हा बँकेचे संचालक जमदाडे यांनी माजी आमदार विलासराव जगताप यांच्या माध्यमातून विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर या प्रयत्नाला यश आले आहे.
मायथळ कॅनॉल मधून माडग्याळ ओढ्यात पाणी सोडनेसाठी खुदाई करिता मशनरी डिझेलच्या खर्चाकरिता खा. पाटील यांच्या खासदार निधीतून १२ लाख मंजुरीचे पत्र देण्यात आले आहे. माडग्याळच्या शिवारावरून पाणी गेले आहे .परंतु माडग्याळला याचा काहीही फायदा होत नव्हता म्हणून गेले तीन वर्षापासून प्रयत्न सुरू होते. जमदाडे यांनी खा. पाटील यांना पाच सहा वेळा भेटून पाणी येऊ शकते सविस्तर माहिती देण्यात आली. सोबत शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ ही त्यांना भेटले होते.

खासदार पाटील यांचा आग्रह, आणि पाठपुरावा यामुळे सुटला प्रश्न

 राजकीय श्रेय वादासाठी अडचणी आणण्यात आल्या होत्या. परंतु खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी यांना वस्तुस्थिती सांगितली व खासदार निधीतून डिझेल  बारा लाख रुपये  खर्चास मंजुरी देण्याची विनंती केली होती.  महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले यांचेशी संपर्क साधून सदरची चर खोदणे कसे आवश्यक आहे हे समजावून सांगितले व कृष्णा खोरे महामंडळ कडील मशिनरी देणेची विनंती केली होती.ही मागणी मान्य करण्यात आली आहे . खासदार पाटील यांनी हा प्रश्न सुटावा म्हणून अधिकाऱ्यासमवेत अनेक वेळा बैठक घेण्यात आली होती .यासाठी माजी आमदार जगताप यांनी ही सध्या तालुक्यात भीषण टंचाई आहे लवकर काम करून दिलासा द्यावा अशी मागणी केली होती.

या कॅनालमुळे पूर्व भागातील शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

मायथळ कालव्यामधून चर खुदाई पूर्ण झाल्यास सहा गावांना लाभ होणार आहे. तसेच पूर्व भागातील दोड्डनाला प्रकल्पात पाणी सोडणे शक्य होणार आहे. यामुळे अनेक गावांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सूटणार आहे तसेच शेतीच्या ही पाण्याचा प्रश्न अगदी कमी खर्चात मिटणार आहे या पाठपुरावामुळे जमदाडे यांचे शेतकरी वर्गातून अभिनंदन होत आहे .यापूर्वी देखील जमदाडे यांनी गुड्डापूर येथील साठवण तलावासाठी संघर्ष केला होता आणि त्या तलावाची ही काम पूर्णत्वास आणण्यासाठी योगदान लाभले होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here