दोन महिन्यात विस्तारित म्हैसाळचे काम सुरू करण्याचे लेखी आश्वासन,दंडवत आंदोलन मागे

0
0
जत : जत विस्तारित सिंचन योजनेच्या टेंडर झालेल्या कामाची त्वरित सुरू करण्यासाठी उद्या शुक्रवार दिनांक 25 ऑगस्ट 2023 रोजी उमदी व मुचंडी येथे होणाऱ्या रस्ता रोको व उमदी ते चडचण कर्नाटक सीमेपर्यंत दंडवत आंदोलन अधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर स्थगिती दिली आहे.
 
जत विस्तारित सिंचन योजनेच्या टेंडर झालेल्या कामाची त्वरित सुरुवात करावे उर्वरित मंजूर झालेल्या कामाची टेंडर काढण्यात यावे यासाठी तालुका पाणी संघर्ष समितीच्या वतीने शुक्रवार 25 ऑगस्ट रोजी रस्ता रोको व उमदी ते चडचण कर्नाटक सीमेपर्यंत आम्हाला कर्नाटक राज्यात समावेश करावा म्हणून दंडवत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आले होते मात्र जलसंपदा विभागाच्या कार्यकारी अभियंता रोहित कोरे यांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले दोन महिन्यात जत विस्तारित सिंचन योजनेच्या कामाला सुरुवात करण्याचे लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले
यावेळी प्रांताधिकारी अजितकुमार नष्टे उपस्थित होते.

 

यावेळी समितीचे अध्यक्ष सुनील पोतदार, उपाध्यक्ष अनिल शिंदे, निवृत्ती शिंदे, गोपाल माळी, कलापा हलकुडे, शशिकांत पाटील, महमद कलाल, चिदानंद संख, महांतेश पाटील, अरविंद मुंगळे, तानाजी मोरे, श्रीमंत परगोंड, राघवेंद्र लोहार, रोहित शिंदे, कुलदीप पवार, सिद्धू मडवले, रियाज शेख, कलपा इंगलागी, कुमार कंचगार, पिंटू कोकले, महादेव मोरे, नितीन माळी,आदी उपस्थित होते.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here