जत : जत तालुक्यातील जालिहाळ येथील जोतिबा चव्हाण याची राज्याच्या टेनिस क्रिकेट संघात निवड झाली आहे.’एकाग्रता,कष्ट व निष्ठा या तीन गुणांच्या बळावर हिमालय ही सर करू शकता’ हे जत तालुक्यातील जालिहाळ बु गावच्या जोतिबा प्रभाकर चव्हाण या मुलाने दाखवून दिले आहे.नाशिक येथे होणाऱ्या 17 वर्ष वयोगट मुलांच्या राष्ट्रीय टेनिस क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या संघात निवड झाल्याबद्दल सर्व जालिहाळ बु ग्रामस्थाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
त्यावेळी उपस्थितानी त्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.घरची परिस्थिती हालाखीची असताना त्यांनी चिकाटी च्या जोरावर उत्तुंग भरारी घेतली आहे.त्याचा परिवार निरंकारी मंडळाच्या आध्यात्मिक क्षेत्रातही अग्रेसर आहे.त्याच्या या प्रयत्नाला समर्थ साथ दिली ती किसन भोसले व सांगली जिल्हा टेनिस क्रिकेट असोशिएशन चे सचिव विजय बिराजदार सर व नितीन तोरणे सर यांचे अनमोल असे मार्गदर्शन लाभले.त्याचे तालुक्यातुन मोठ्या प्रमाणात कौतुकाचा वर्षाव होत आहे.