जीवनाला ‌कंटाळलोय,सोशल मिडियावर चिठ्ठी पाठवत जतनजिक तरुणाची आत्महत्या 

0
4
मला जिवनाचा कंटाळा आलाय,अशी चिठ्ठी लिहून नातेवाईकांना सोशल मीडियाव्दारे पाठवून एका तरूणाने घरासमोरील झाडास गळफास लावून आत्महत्या केली.भिमु पांडुरंग माने (वय ३०, व्यवसाय ड्रायव्हर) असे मयत तरूणाचे नाव आहे.जत- शेगाव रोडवर जतपासुन जवळ माने वस्ती येथे आज, शनिवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली.

अधिक माहिती अशी,जत -शेगाव रस्त्यावर रेवनाळ गावाच्या जवळ जत शहराच्या हद्दीतील माने वस्ती येथे भीमू राहतो.भीमू  माने अविवाहित असून खाजगी वाहनावर चालक म्हणून काम करतो.शुक्रवारी रात्रीच त्याने मी जीवनाला कंटाळलो आहे. याबाबत माझ्या आई – वडिलांना पोलिसांनी त्रास देऊ नका,असे चिठ्ठीत लिहून त्याने नातेवाईकांनाही पाठविले होते.

नातेवाईकांनी त्याच्या भावास व आई, वडील यांना याची माहिती दिली. अन् आज पहाटेच्या सुमारास घरासमोरील झाडास भिमुचा गळफास घेतलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आला.माहिती मिळताच जत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जत ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून नातेवाईकाच्या ताब्यात दिला आहे. याबाबत त्याचा भाऊ श्याम माने यांनी जत पोलीसात फिर्याद दिली आहे.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here