जत: लोहगाव (ता. जत) येथील माया
भाऊसाहेब कोळेकर (वय ३०,रा.कोळेकरवाडी, लोहगाव) या विवाहितेने घराजवळ असलेल्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.ही घटना रविवारी रात्री अकरा वाजता घडली.पतीच्या दारूच्या व्यसनाला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचे नातेवाईकांनी सांगितले.

त्यांच्या पश्चात पती, सासू, सासरे, मुलगा, दोन
मुली असा परिवार आहे. माया यांचे माहेर सांगोला तालुक्यातील हंगिरगे आहे. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे. अधिक तपास सुरु आहे.