सिंगनहळ्ळीजवळ दुचाकीस्वार ठार

0
जत : सांगोला येथील रविवारच्या जनावरांच्या बाजारातून गावी परत येत असताना दुचाकी घसरून रेवनाळ (ता. जत) येथील शिवाजी आण्णाप्पा वाघमोडे (वय ४५) यांचा मृत्यू झाला.अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली.

शिवाजी वाघमोडे दिवाळीनिमित्त गाय विकत घेण्यासाठी मुलागा रोहित (वय ११) याच्यासह सांगोला येथील जनावरांच्या बाजारात गेले होते.बाजारातून गावी परतत असताना
सिंगनहळ्ळीजवळ रस्त्यावरून त्यांची
दुचाकी घसरली.अपघातात त्यांच्या
जबड्यास मार लागला. बरगडी मोडून गंभीर दुखापत झाली; तसेच सोबत असणाऱ्या मुलाचे दोन्ही हात मोडले.जखमी पिता-पुत्रांना काहींनी जत येथील खासगी रुग्णालयात नेले.प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना सांगलीला पाठविण्यात आले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

जत : सांगोला येथील रविवारच्या जनावरांच्या बाजारातून गावी परत येत असताना दुचाकी घसरून रेवनाळ (ता. जत) येथील शिवाजी आण्णाप्पा वाघमोडे (वय ४५) यांचा मृत्यू झाला.अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रात्री उशिरा घडली.शिवाजी वाघमोडे दिवाळीनिमित्त गाय विकत घेण्यासाठी मुलागा रोहित (वय ११) याच्यासह सांगोला येथील जनावरांच्या बाजारात गेले होते.
Rate Card
बाजारातून गावी परतत असताना सिंगनहळ्ळीजवळ रस्त्यावरून त्यांची
दुचाकी घसरली.अपघातात त्यांच्या
जबड्यास मार लागला. बरगडी मोडून गंभीर दुखापत झाली; तसेच सोबत असणाऱ्या मुलाचे दोन्ही हात मोडले.जखमी पिता-पुत्रांना काहींनी जत येथील खासगी रुग्णालयात नेले.प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना सांगलीला पाठविण्यात आले; मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.