स्वस्त सोन्याच्या आमिषाने महिलेस नऊ लाखांचा गंडा,आणखीन एक गुन्हा दाखल

0
जत: जत येथे स्वस्तात सोने देतो म्हणून फसवणूक करणारे रैकेट’ मोठे असण्याची शक्यता वर्तविली जात असतानाच आणखी एका महिलेची फसवणूक झाल्याचे उघड झाले आहे. याबाबतची फिर्याद जत पोलिसांत दाखल झाली आहे. यापूर्वी साडे सव्वीस लाखांच्या फसवणूक प्रकरणात सध्या अटकेत असलेले मेहबूब रमजान शेख (रा. एमआयडीसी जत), दऱ्याप्पा यल्लाप्पा हवीनाळ (रा.विठ्ठलनगर, जत) या दोघांवर नऊ लाखांची फसवणूक केल्याने आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे.दरम्यान, अटकेतील दोघेही सध्या पोलिस कोठडीत आहेत.

त्यांना न्यायालयाने कोठडी सोमवारी सुनावण्यात आली आहे.त्यात हा दुसरा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद पद्मिनी पांडुरंग गावडे (रा.रेवनाळ) या महिलेने जत पोलिसांत
दिली आहे.२ नोव्हेंबरला आंध्र प्रदेशातील एका व्यापाऱ्यास जत येथील पाचजणांनी स्वस्तात सोने देतो म्हणून बोलवले होते.त्यानंतर फसवणूक केली होती.याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. सध्या ते पोलिस कोठडीत आहेत.याच प्रकरणात पोलिस अधीक्षक बसवराज तेली यांनी तीन पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे.

Rate Card
या तिघांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवला आहे.यातच रेवनाळ येथील फसवणूक झालेल्या महिलेने मेहबूब शेख व दर्याप्पा हवीनाळ या दोघांनी नऊ लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद दिली आहे.स्वस्तात सोने देतो म्हणून पैसेही घेतले आहेत.परंतु, सोने व पैसे परत दिले नाहीत. फसवणूक लक्षात आल्याने दोघांच्या विरोधात तक्रार दिली आहे.
पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन
पोलिस उपाधीक्षक सुनील साळुंखे यांनी या प्रकरणात आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन केले होते.या आव्हानास अनुसरून अशा प्रकारच्या तक्रारी जत पोलिसांत येत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.