बोगद्यात अडकलेल्या सर्व 41 कामगारांना १७ दिवसानंतर बाहेर काढण्यात यश

0
उत्तराखंडमधील सिल्क्यारा बोगद्यामध्ये अडकलेल्या ४१ कामगारांची अखेर १७ दिवसांनी सुटका झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या या मदतकार्याला अखेर यश आलं आहे.12 नोव्हेंबरला बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात होते. त्यासाठी विदेश तज्ज्ञांची मदत देखील घेण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी मदतकार्याकडे लक्ष ठेवून होते.सर्व कामगारांना बाहेर काढण्यात आले असून त्यांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे.
बोगद्याचे काम सुरु असताना काही भाग कोसळल्याने ४१ मजूर आतमध्ये अडकले होते. त्यांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु होते, पण या कामात विविध अडथळे येत होते.मजुरांना पाईपलाईन द्वारे अन्न आणि पाण्याचा पुरवठा केला जात होता. मजुरांनी १७ दिवस बोगद्यात राहण्याचं आव्हान पेललं आहे.आवश्यक उपचारानंतर मजूरांना त्यांच्या घरी सोडण्यात येईल.
Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.