के.एम.हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदाची जबाबदारी, आता यांच्या खाद्यावर

0जत,संकेत टाइम्स : जत येथील दि पिपल्स एजुकेश सोसायटी संचलित के एम हायस्कूल अँन्ड ज्युनीयर काॅलेजच्या मुख्याध्यापकपदी एस.एम.सोलापूरे यांची निवड करण्यात आली.


त्यांचा सत्कार के.एम.हायस्कूलचे उपाध्यक्ष पिंटू संख यांनी केला. यावेळी सेक्रेटरी डॉ विजय पाटील, संचालक चद्रंशेखर गोब्बी,डॉ.मनोहर मोदी,शिक्षक भुषण माने, निलेश तुराई इतर शिक्षक,कर्मचारी उपस्थित होते.यावेळी  नुतन मुख्याध्यापक एस.एम.सोलापूरे म्हणाले की,के एम हायस्कूल ही शिक्षण संस्था जत तालुक्यात एक अग्रगण्य संस्था आहे.


Rate Card
या संस्थेचा नाव लौकिक मिळवण्यासाठी प्रयत्न करणार आहे.आगामी काळात निरनिराळ्या कोर्सेस संस्थेत मार्फत सुरू करण्याचा मानस आहे. दरम्यान मुख्याध्यापक एस एम सोलापूरे यांच्या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.


के.एम.हायस्कूलच्या मुख्याध्यापकपदी एस.एम.सोलापूरे यांची निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.