नियोजित जागेत सुसज्ज बसस्थानक बांधा ; जतकरांची मागणी

0जत,संकेत टाइम्स : जत शहरातून जाणारा विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर मोक्याच्या ठिकाणी जत आगाराची जागा असून या जागेवर बी.ओ.टी.मधून अद्यावत असे शाॅपिंगमाॅलसह सर्व सोईनेयुक्त बसस्थानक उभे करण्यासाठी जतचे क्रियाशील आमदार विक्रमसिंह सावंत यांनी पुढाकार घ्यावा,अशी अपेक्षा जत तालुकावासियांतून करण्यात येत आहे. 

आपल्या शेजारील कर्नाटक राज्यातील आपल्या तालुक्याच्या सिमेलगतची सर्वच परिवहन विभागांतर्गत असलेली  बसस्थानके अद्यावत व सर्व सोईनेयुक्त अशी नव्याने उभारली आहेत. 


जत बसस्थानकाची अवस्था तर फारच बिकट झाली असून या स्थानकावर प्रवाशांचे सोइपेक्षा गैरसोईच जास्त आहेत. या बसस्थानकाची अवस्था असून अडचण नसून खोळंबा अशी झाली आहे.जत तालुक्यातील एकूण गावाचा विचार केला तर जतला सर्व सोईनेयुक्त असे अद्यावत बसस्थानक यापूर्वीच होणे अपेक्षित होते. पण याकडे कोणीही लोकप्रतिनिधीनी गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यामुळे हा बसस्थानकाचा प्रश्न प्रलंबीतच राहीला आहे. 


जत एस.टी.आगाराची विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर तसेच जत शेगाव या मार्गावर चारपाच एकर इतकी जागा आहे. या जागेवर सद्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली आहेत. विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या एस.टी.च्या दक्षिण बाजूने व उत्तर बाजूने अतिक्रमणे झाल्याने एस.टी.आगाराची बांधकाम करणेबाबत अडचण निर्माण झाली आहे. 

आमदार विक्रमसिंह सावंत यांनी विशेष प्रयत्न करून जत येथिल एस.टी. आगाराचे विजापूर गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तसेच मंगळवेढा ऐगळी या राज्यमार्गावरील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या एस.टी.च्या स्व:ताच्या जागेवर बांधा,वापरा आणि हस्तांतरीत करा (बी.ओ.टी.) या तत्वावर सर्व सोईनेयुक्त असे अद्यावत बसस्थानक उभे करण्यासाठी पुढाकार घ्यावा,या जागेवर महामार्गालगत असलेल्या जागेवर भव्य असे सर्व सोईनेयुक्त असे शाॅपिंगमाॅलसह भाडेतत्वावर दुकानगाळे तयार करावेत. 


Rate Card


तसेच सद्या ज्या ठिकाणी जत आगाराचे एस.टी.बसस्थानक आहे.व एस.टी.चे वर्कशॉप आहे.त्या ठिकाणी फक्त एस.टी.चे वर्कशॉप ठेवून या ठिकाणी ही एस.टी.बसस्थानकाच्या जागेवर बि.ओ.टी.तून सर्व सुखसोयीनेयुक्त असे  शाॅपिंगमाॅलसह अनेक दुकानगाळे ही  बांधता येतील.यामुळे एस.टी.महामंडळाच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होईल.जत शहराच्या सौंदर्यात आणखी भरही पडेल.यासाठी आ.सावंत यांनी पुढाकार घ्यावा,अशी अपेक्षा ही जत तालुकावासियांतून व्यक्त करण्यात येत आहे.जत शहरातील विजापूर-गुहागर महामार्ग लगत असलेल्या एसटी महामंडळाच्या जागेत अतिक्रमणे झाली आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.