निरंकारी स्वयंसेवकांनी केली पाणीसाठ्याची स्वच्छता

0
जत : सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली ‘अमृत प्रोजेक्ट’ अंतर्गत ‘स्वच्छ जल, स्वच्छ मन’ परियोजनेच्या द्वितिय टप्प्याचा शुभारंभ यमुना नदीचा छठ घाट, आई. टी. ओ, दिल्ली येथून करण्यात आला. बाबा हरदेवसिंहजी महाराज यांच्या शिकवणूकीतून प्रेरित अशी ही परियोजना भारताच्या 27 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांतील 1533 ठिकाणी 11 लाखाहून अधिक स्वयंसेवकांच्या सहभागाद्वारे विशाल रुपात यशस्वीरित्या आयोजित करण्यात आली.

 

प्रोजेक्ट अमृत अंतर्गत “स्वच्छ जल स्वच्छ मन” ही परियोजना जतमध्ये ही जत शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बिरनाळ तलावाजवळील जलसाठा विहिर परिसराची स्वच्छता करण्यात आली यामध्ये शेकडोंच्या संख्येने स्वयंसेवकांनी भाग घेतला यावेळी जत नगरपरिषदेचे पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी अजिंक्य पाटील तसेच स्वच्छता निरीक्षक हिमाली साळे यांनी सदर कार्यक्रमास उपस्थित राहुन या कार्याचे कौतुक केले मंडळाचे स्वयंसेवक निष्काम भावनेने सेवा करतात खरोखरच मंडळाची शिकवण खुप महान आहे सर्वांनी आत्मसात करणे गरजेचे आहे असे उदगार काढले त्यांनी या कार्यास शुभेच्छा दिल्या.

 

जत येथील कार्यक्रमाचे नियोजन जत शाखेचे जोतिबा गोरे,सेवादल विभागाचे संभाजी साळे यांनी केले.‘प्रोजेक्ट अमृत’च्या द्वितिय टप्प्याचा प्रारंभ करताना निरंकारी राजपिता रमितजी यांनी सद्गुरु माताजींच्या आशीर्वचनापूर्वी आपल्या संबोधनामध्ये म्हटले, की बाबा हरदेवसिंहजी यांनी आपल्या जीवनात आम्हाला हीच प्रेरणा दिली, की सेवा निष्काम भावनेनेच व्हायला हवी. त्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रशंसेची इच्छा नसावी. सेवा करताना आपण तिच्या प्रदर्शनाचा गाजावाजा न करता सेवेच्या मूळ भावनेवर केंद्रीय राहायला हवे. स्वत:चे आंतरिक परिवर्तन घडवून आणण्याकडे आपले लक्ष द्यायला हवे. कारण त्यातूनच समाज आणि जगामध्ये परिवर्तन घडून येऊ शकते. स्वच्छ आणि निर्मळ मनातूनच सात्विक परिवर्तनाचा उगम होतो.
Rate Card
सद्गुरु माताजींनी “प्रोजेक्ट अमृत” या प्रसंगी आपल्या पावन आशीर्वचनामध्ये सांगितले, की आपल्या जीवनात पाण्याला फार महत्व आहे, जल हे अमृतासमान होय. जल आपल्या जीवनाचा मुलभूत आधार आहे. परमात्म्याने आपल्याला ही जी स्वच्छ व सुंदर सृष्टी बहाल केली आहे तिची देखभाल करणे आमचे कर्तव्य आहे. मानवी रूपातच आपण या अमूल्य अमानतीचा दुरुपयोग करुन ती प्रदूषित केली आहे. आपण प्रकृतीला तिच्या मूळ रुपात प्रतिष्ठापित करुन तिची स्वच्छता करायला हवी. हे आपण आपल्या कर्मातून सांगायला हवे केवळ शब्दांतून नव्हे. कणाकणातून व्याप्त परमात्म्याश्याी जेव्हा आपले नाते जोडले जाते आणि आपण याचा आधार घेऊ लागतो तेव्हा याच्या रचनेवरही आपले प्रेम जडते. आपण या जगात आलो आहोत तर या धरतीला आणखी सुंदर रुपात सोडून जाण्याचा आपला प्रयास असायला हवा.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.