मध्यरात्री अचानक घरास आग,चिमुकलीचा भाजून मृत्यू

0
16
करजगी : आकळवाडी ता.जत येथील घरवजा छपराला लागलेल्या आगीत चिमुकलीचा भाजून दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री घडली आहे.एक वर्षीय अनन्या आडवय्या कळळीमठ असे मृत्त चिमुकलीचे नाव आहे.

 

अधिक माहिती अशी की,आकळवाडीतील अडवया कळळीमठ हे कुंटुबासह आकळवाडी ते बालगाव रस्त्यालगत शेतात राहतात.मंगळवारी रात्री उखाडा असल्याने सर्व कुंटुबीय झोपी गेले होते. चिमुकली अनन्या ही झोपत नसल्याने तिला घरातील पाळण्यात झोपविले होते.मध्यरात्री घरास अचानक आग लागली.आगीच्या ज्वाळाने सर्वजण जागे झाले.सर्वांनी आग विजविण्याचा प्रयत्न केला मात्र छप्पर असल्याने आगीचे उग्ररूप धारण केले.

 

आगीत चिमुकलीचा भाजून मृत्यू झाला.तर घरातील धान्याची पोती,संसार उपयोगी साहित्य रोख रक्कम,कपडे,सोने चांदीचे ‌दागिणे असे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले.घटनेची माहिती उमदी पोलीसांना देण्यात आली.उपनिरिक्षक खरात,बीट हवलदार मासाळ,पोटभरे ‌यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली.
Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here