संख : उटगी ता.जत येथील विवाहिता चन्नाक्का महांतेश कोळगिरी (वय २०)हिच्या मृत्यूप्रकरणी पती महांतेश शिवाप्पा कोळगीरी,सासू महानंदा शिवाप्पा कोळगिरी,सासरा शिवाप्पा तम्माराया कोळगिरी या तिघाविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल झाला असून तिघांनी मिळून गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने याप्रकरणी उमदी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,उटगी येथे आज ता.20 एप्रिल रोजी चिन्नम्मा मांनतेश कोळगिरी (वय 24, रा कोळगिरी वस्ती उटगी) हिने गळपासाने मृत्यू झाल्याचा पती व सासू-सासऱ्यांचा बनाव उघड झाला असून मयत पत्नी चिन्नम्मा यांच्या नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलीसांनी केलेल्या तपासात
तिचा गळा दाबून खून केल्याचे उघडकीस आले आहे.
सदर घटनेची उमदी पोलिसांनी कसून चौकशी करत असतांना संशयित पती मांनतेश शिवाप्पा कोळगिरी,सासरा शिवाप्पा तम्माराया कोळगिरी,सासू महानंदा शिवाप्पा कोळगिरी (सर्व रा. कोळगिरी वस्ती,उटगी ता.जत) यांनी क्रुझर गाडी घेणेसाठी माहेरहून पैसे आण असे म्हणून तिचा जाचहाट करून तिचा ता.२० एप्रिल रोजी पहाटेच्या दरम्यान राहते घरी गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.
याप्रकरणी गौरीष मल्लिकार्जुन लक्कौंड,रा. खेडगी ता.इंडी जि. विजापुर यांनी फिर्याद दिली आहे.पुढील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक खरात करीत आहेत.