सार्वजनिक बांधकामच्या रिंग करून निविदा मँनेज करण्याचा प्रकार ; सुनिता पवार यांची ‌जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार

0



जत,संकेत टाइम्स : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामांचे रिंग करुन काम वाटप करुन भष्टाचार करण्यात येत असल्याची तक्रार जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती सुनिता पवार यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

तक्रारीत म्हटले आहे की,जत तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे 17 कोटींची कामे निघाली आहेत.सदरच्या 17 कोटीच्या कामाच्या ई निविदा प्रसिध्द झाल्या आहेत. 





तरी मंगळवार दिनांक 1 जून 2021 रोजी जत येथील पांढरा बंगला गेस्ट हाऊस येथे जतचे आमदार विक्रमसिंह सावंत व मिरज विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. रोकडे यांनी मर्जीतील असलेल्या कंत्राटदारांची मिटिंग बोलावली होती. सदर मिटींगमध्ये जत तालुक्यातील सर्व रजिस्टर कंत्राटदार उपस्थित होते. या मिटींगमध्ये आमदार श्री.सावंत व रोकडे यांनी 17 कोटींची कामे रिंग करुन व ई टेडर मॅनेज करुन प्रत्येक कंत्राटदाराला प्रत्येकी एक काम वाटप केले.



Rate Card



कंत्राटदारानी स्पर्धा न करता एकेक काम घ्यावे. व अंदाजपत्रकीय दरानेच निविदा भराव्यात अशी धमकी दिली. मी सांगितलेल्या कंत्राटदारांनीच ई निविदा भरायच्या, जरी कुणी स्पर्धा केली तर गाठ माझ्याशी आहे असा दम आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सर्व कंत्राटदारांना दिला आहे.कार्यकारी अभियंता श्री.रोकडे यांनी

कंत्राटदाराना आमदार सांगतील त्याप्रमाणे कामे भरा, स्पर्धा करू नका, शेवटी काम मीच पहाणार आहे असा कडक‌ शंब्दात‌ सुनावले आहे.सार्वजनीक बांधकाम विभागाकडील कामे अंदाजपत्रकीय दराने कत्राटदारांना मॅनेज करून देऊन कंत्राटदाराकडून मलिदा घेण्याचा डाव खेळला जात आहे. जत तालुक्याचे लोकसेवक या नात्याने आ. विक्रमसिंह सावंत यांनी कंत्राटदाराची कामे मॅनेज करणेबाबत मिटिंग बोलवणेच चुकिचे आहे.





व या मिटिंगला शासकीय अधिकारी श्री.रोकडे यांनी हजर राहून कंत्राटदाराला दम देणे म्हणजेच कुपनानेच शेत खाण्यासारखा प्रकार आहे.तरी जिल्ह्याचे प्रमुख या नात्याने आपण या बेकायदेशीर कामवाटप मिटिंगची चौकशी करून सदरील कामांच्या ई निविदेमध्ये निकोप स्पर्धा घडवून शासनाचे होणारे नुकसान टाळावे,भष्ट अधिकारी, लोकसेवक यांना वेसण घालावी,अशी मागणी सुनिता पवार यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.