सांगली जिल्ह्यात फिरते लोकअदालतीचे आयोजन  

0
22

सांगली : उच्च न्यायालय विधी सेवा समिती, मुंबई चे सचिव यांच्याकडून सांगली जिल्ह्यामध्ये फिरते लोकअदालत दि. 2 सप्टेंबर 2024 ते दि. 5 ऑक्टोबर 2024 अखेर आयोजित करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्याअनुषंगाने सांगली जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमध्ये कायदेविषयक शिबिर व फिरते लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. पक्षकारांनी आपल्या गावामधील न्यायालयातील तडजोडपात्र प्रलंबित प्रकरणे सामोपचाराने मिटवून घ्यावीत व फिरते लोक अदालत यशस्वी करण्यास मदत करावी, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी केले आहे.
सांगली जिल्ह्यामधील सर्व तालुक्यांमध्ये दिनांक 2 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर कालावधीमध्ये कायदेविषयक शिबिर कवठेपिरान (मिरज), कोरेगाव व कामेरी (वाळवा), पुनवत (शिराळा),  शिवाजीनगर (कडेगांव), बांबवडे (पलूस), रेनावी (खानापूर), राजेवाडी (आटपाडी), उपळावी (तासगांव), टाकळी (मिरज), पिंपळवाडी (कवठेमहांकाळ), एकुंडी व वाळेखिंडी (जत) या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.

तसेच फिरते लोकअदालत नेर्ले (वाळवा), कांदे (शिराळा), चिंचणीवांगी (कडेगांव), बांबवडे (पलूस), नागेवाडी (खानापूर), विठलापूर (आटपाडी), शिरगांव कवठे (तासगांव), एरंडोली (मिरज), खरशिंग (कवठेमहांकाळ), गुड्डापूर (जत) या ग्रामपंचायतीमध्ये आयोजित करण्यात आलेले आहे. या गावातील तडजोडपात्र दिवाणी व फौजदारी प्रकरणे फिरत्या लोक अदालतीसाठी ठेवली आहेत, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकणाचे सचिव गि.ग. कांबळे यांनी दिली.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here