हेल्पलाइन क्रमांक – ९८६१७१७१७१ द्वारे लोककेंद्रित योजनांवरील १ लाख ६० हजारांहून अधिक प्रश्नांचे निराकरण
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या महाराष्ट्रवादी हेल्पलाइन ९८६१७१७१७१ ला संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. ही हेल्पलाइन सुरू झाल्यापासून अवघ्या ६ दिवसांत विक्रमी २.५ लाख लोकांनी आपल्या समस्या विचारल्या आहेत. यापैकी लोककेंद्रित कल्याणकारी योजनांशी संबंधित १ लाख ६० हजार प्रश्नांचे निराकरण करण्यात आले आहे. २२ ऑगस्ट रोजी अजित पवार यांनी सुरू केलेला महाराष्ट्रवादी हेल्पलाइन क्रमांक कल्याणकारी योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचावा यासाठी आहे.
या लोककेंद्रित उपक्रमाद्वारे माझी लाडकी बहिन योजना आणि अन्नपूर्णा योजना यांसारख्या प्रमुख योजनांसह कल्याणकारी योजनांची तपशीलवार माहिती दिली जात आहे. या हेल्पलाइन क्रमांकावर नागरिकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी कॉल करण्याचीही गरज नाही. फक्त व्हॉट्सॲप हेल्पलाइन नंबरवर मेसेज पाठवून आपल्याला मदत मिळवता येते. स्वयंचलित चॅटबॉट प्रणाली लोकांना त्यांच्या गरजा, शंका आणि तक्रारी नोंदवण्याबाबत इंग्रजी, हिंदी आणि मराठी या ३ भाषांमध्ये मार्गदर्शन करते.
लोकांनी उपस्थित केलेल्या समस्या २४-४८ तासांच्या आत सोडवल्या जात आहेत आणि उपमुख्यमंत्री कार्यालय दररोज संध्याकाळी सतत लोकांच्या काय प्रतिक्रिया आहेत, याचा आढावा घेत आहे.
महाराष्ट्रातील २.५ कोटी कुटुंबांपर्यंत पोहोचता यावं हे या हेल्पलाइन उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. लोकांनी दिलेला प्रतिसाद पाहता हे लक्ष लवकरच साध्य होईल, अशी अपेक्षा आहे. राज्यातील २.५ कोटी घरांच्या बाहेर या हेल्पलाइन क्रमांकासह पक्षाचे कार्यकर्ते एक मोठे स्टिकर देखील चिकटवत आहेत, विशेषत: ग्रामीण भागात यावर जास्त लक्ष जेण्यात येत आहे. कारण, येथील जनतेला दररोज अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो.