थेट महामार्गाची रुंदीच केली कमी,काय आहे यामागचे गौडबंगाल

0जत,संकेत टाइम्स : जत शहरातून जाणारी विजापूर-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर असलेली शहरातील बड्या धेंड्याची अतिक्रमणे वाचविण्यासाठीच या महामार्गाची प्रस्तावित रूंदी ही कमी करण्यात आलेची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


विजापूर- गुहागर हा राष्ट्रीय महामार्ग जत शहरातून जातो.या महामार्गाची जत शहरातून जाणारे रस्त्याची प्रस्तावित रूंदी ही चोविस मिटर इतकी होती.परंतु  प्रत्यक्षात जेंव्हा या रस्त्याचे कामाला सुरुवात झाली त्यावेळी या चोविस मिटर रूंदीच्या रस्त्यावर जत शहरातील अनेक राजकीय मंडळी व बडे धेंडे यांची अतिक्रमणे येत असल्याने त्यानी आपली अतिक्रमणे वाचविण्यासाठी राजकिय बळाचा वापर केला.त्यामुळे प्रस्तावित रस्त्याची रूंदी ही कमी झाली आहे. 


राजकिय मंडळीनी राष्ट्रीय प्राधिकरणाचे चांगल्या प्रकारे सुरू असलेले काम बंद पाडून आपली अतिक्रमणे वाचविण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाकडील सिटी सर्व्हेच्या मापाप्रमाणे जत शहरातून जाणारे रस्त्याची मापे घेतल्याने या मार्गाची जत शहरातील रस्त्याचे माप हे कमी अधिक झाल्याचे दिसून येत आहे. या रस्त्याचे काम प्रस्तावित मापाप्रमाणे झाले असतेतर भविष्यात या रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी व अपघात यावर नियंत्रण आले असते. परंतु राजकारणामुळे हा महामार्ग नेहमी चर्चेत राहीला आहे. 
Rate Cardविजापूर-गुहागर हा राष्ट्रीय महामार्ग आहे.हा महामार्ग जत शहरातून जात असल्याने सद्या असलेली जत शहरातील या महामार्गाची रुंदी ही आठरा ते विस मिटर इतकीच आहे.त्यातच जत शहरात रस्त्याचे मध्ये अर्धा मिटरचे रोड डिव्हायडरही बसविण्यात येणार आहेत.जत शहरात बसविण्यात येणारे डिव्हायडर हे अर्धा मिटर रूंदीचे असून हे डिव्हायडर बसविण्याची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची नसून शहरातून जाणारे या महामार्गाच्या मधोमध डिव्हायडर बसविण्याचे काम हे जत नगरपरिषदेचे आहे.अशी माहिती राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी अनिल पाटील यांनी दिली आहे. 

विजापूर-गुहागर हा राष्ट्रीय महामार्ग असल्याने या पुढील काळात या राष्ट्रीय महामार्गावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वाहतूक सुरू होणार असल्याने व मुळातच या महामार्गाची जत शहरातून जाणारे रस्त्याची रूंदी ही कमी म्हणजे रस्त्याकडील गटारी, साईडपट्टी व रस्ता दुभाजक धरून निव्वळ रूंदी ही फक्त आठरा ते विस मिटर इतकीच राहणार असल्याने जत शहरात अपघाताचे प्रमाणात मोठी वाढ होणार आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जत शहरातून जाणारे या रस्त्याचे दोन्ही बाजूला असलेल्या गटारीवर लोखंडी बॅरेकेट बसविण्याचे काम सुरू केले असून सद्या जत एम.आय.डी.सी.कडून हे बॅरेकेटींग बसविण्याचे काम सुरू आहे. यामुळे बाहेरील वाहने आत प्रवेश करण्याला आळा बसणार आहे.

सद्या या महामार्गाच्या दोन्ही बाजूला गटारी असून या गटारीचे आतील बाजूस पेव्हींग ब्लाॅकस बसविण्याचे काम सुरू आहे.तसेच रस्त्याचे दोन्ही बाजूला स्ट्रीट लाईट बसविण्यात येत आहेत. शहरातून जाणारे या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याचे दोन्ही बाजूला असलेल्या गटारीवर व पेव्हींग ब्लाॅकसवर लोकांनी अतिक्रमण केल्याने तसेच जत शहरातील दुचाकी व चारचाकी वाहनधारक आपली वाहने रस्त्याचे साईडपट्टयावर उभी करत असल्याने आधिच अरूंद असलेला रस्ता अधिकच अरूंद होऊ लागला आहे.यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने जत शहरातून जाणारे या महामार्गाच्या दोन्ही बाजूला लोखंडी बॅरेकेट ऊभे करून रस्त्यावर होत असलेल्या अतिक्रमणाला आळा घालावा अशी अपेक्षा जत शहरवासियांकडून करण्यात येत आहे.

जत‌ शहरातील प्रमुख महामार्ग असलेल्या विजापूर-गुहागर महामार्गाची रुंदी कमी,जास्त करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.