भाजपकडून काँग्रेसमध्ये फूट पाडण्याचा केविलवाणा प्रयत्न | -पृथ्वीराज पाटील : विरोधकांची खेळी सांगलीत अयशस्वी होणार

0

लोकसभा निवडणुकीत सांगली भाजपचा दणदणीत पराभव झाल्यामुळे ते मागील विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज पाटील काठावर असणाऱ्या जागांवर काँग्रेसमध्ये फूट पाडून तेथे अपक्ष उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहेत, असा आरोप काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. भाजपची ही खेळी सांगलीत यशस्वी होणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

 

पृथ्वीराज पाटील म्हणाले, मागील २०१९ची सांगली विधानसभा मी लढवली. उशिरा उमेदवारी जाहीर झाल्यामुळे तीव्र इच्छा असूनही कमी वेळात सर्व जनतेशी संवाद साधता आला नाही. तरीही सांगलीकरांनी मतदान करून मला सहकार्य केले आहे. काठावरचा पराभव झाला, म्हणून जनतेची सेवा करायचे थांबलो नाही. निकालाच्या दिवसापासून जनतेचे दुसऱ्या प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरलो. काँग्रेसने लोकसभा निवडणुकीत खूप चांगले यश मिळविले. विधानसभेतही महायुतीला धोका होणार आहे.म्हणूनच भाजपकडून विधानसभेच्या काठावर विजय झालेल्या ठिकाणी काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी त्यांचा प्रयत्न आहे. पण, सांगलीत ते आम्ही कधीही होऊ देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

महाविकास आघाडीचा मीच उमेदवार महाविकास आघाडीकडून सांगलीत मीच उमेदवार असणार आहे. तसा शब्द पक्षाने मला दिला आहे, अशी भुमिका पृथ्वीराज पाटील यांनी मांडली. तसेच उमेदवारीवरुन वाद नको, असा कानमंत्र माजी मंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिला आहे. यामुळे उमेदवारीबाबत कोण काय म्हणतात, याबद्दल काहीही बोलणार नाही, असेही ते म्हणाले.

 

Rate Card

‘संवाद सांगलीसाठी उपक्रम सांगलीच्या विकासाचा ‘संवाद सांगलीसाठी हा संकल्प आम्ही सुरू केला आहे. सांगली विधानसभा क्षेत्रातील प्रभागनिहाय बैठकांचे आयोजन करून आलेल्या सूचना एकत्रित करून सांगली अधिक चांगली करण्याचा संकल्पनामा तयार करणार आहे. युवक युवती, महिला, ज्येष्ठ नागरिक, विचारवंत, बुध्दिजिवी वर्ग या सर्वच घटकांशी मला बोलायचं आहे. यासाठी संवाद बैठकीतून नागरिकांकडून प्राप्त सूचनांची माहिती एकत्रित करून सांगलीच्या विकासासाठी प्रयत्न करणार आहे, असा विश्वासही पृथ्वीराज पाटील यांनी व्यक्त केला.

 

सांगलीत आम्ही एकसंघच
जयश्रीताई पाटील आणि मी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करत आहोत. आमच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत. पण, काही लोक मुद्दाम आमच्यात मतभेद असल्याचे सांगून काँग्रेसप्रेमी नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत, असेही पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.