महावितरणकडून ‘अभय योजना’ : व्याज, विलंब शुल्क होणार माफ दोन लाख थकबाकीदारांकडे महावितरणची ३३ कोटी बाकी

0

सांगली : बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या जिल्ह्यातील दोन लाख दोन हजार ५३६ घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला आहे. या वीज ग्राहकांकडे ३२ कोटी ९० लाख रुपयांची थकबाकी आहे. या वीज ग्राहकांसाठी महावितरणने ‘अभय योजना २०२४’ आणली आहे. यामध्ये वीज ग्राहकांच्या वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकार माफ होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार, कोणत्याही जागेच्या मालक किंवा खरेदीदार किंवा ताबेदार यांनी वीज बिलाची थकबाकी रक्कम भरणे बंधनकारक आहे. तथापि, थेट कायदेशीर कारवाई करण्याच्याऐवजी सुविधा म्हणूनही सवलतीची योजना लागू केली आहे.

महावितरणच्या ३१ मार्च २०२४ पर्यंत थकीत बिलामुळे कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित झालेल्या घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक ग्राहकांसाठी ही योजना आहे. थकित बिलांच्या योजनेत कृषी ग्राहकांचा समावेश नाही. योजनेचा कालावधी १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२४ आहे. जिल्ह्यातील दोन लाख दोन हजार ५३६ ग्राहकांकडून महावितरणला मूळ बिलाची ३२ कोटी २० लाख रुपये आणि व्याज आणि विलंब आकार थकीत आहे. तथापि, या वीज ग्राहकांना दिलासा देण्यास थकीत बिलाच्या मूळ रकमेवरील व्याज व विलंब आकाराच्या स्वरूपातील दंड माफ करण्यात येईल.

Rate Card

सहा हप्त्यात पैसे भरण्यास सवलत मूळ बिलाच्या ३० टक्के रक्कम भरून उर्वरित ७० टक्के रक्कम सहा हप्त्यांत भरायची सवलत ग्राहकांना मिळेल. जे घरगुती, व्यावसायिक, आदी लघुदाब ग्राहक एकरकमी थकीत बिल भरतील त्यांना दहा टक्के सवलत देण्यात येईल. उच्चदाब औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांना पाच टक्के सवलत मिळेल.

www.mahadiscom.in/wss/wss या वेबसाइटवरून संबंधित वीज ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने अभय योजनेचा लाभ घेता येईल. महावितरणच्या मोबाइल अॅपवरून योजनेचा लाभ घेता येईल. वीज ग्राहक १९१२ किंवा १८००२३३३४३५ किंवा १८००२१२३४३५ या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही माहिती घेऊ शकतात. योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नियमित वीज कनेक्शन घेता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.