जत : जत तालुक्यातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विक्रम फाऊंडेशनतर्फे सलाम तुमच्या कार्याला या नावाने भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. यावेळी आ. विक्रमसिंह सावंत यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत या सेविकांचे योगदानाचे आ.सावंत यांनी कौतुक करण्यात आले.
कार्यक्रमात सर्व सेविकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच रिल स्टार ताई संभाजी नुलके यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. महिलांसाठी विविध स्पर्धांचेही आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमात उपस्थित प्रमुख मान्यवरांमध्ये सांगली अप्पर पोलीस अधिक्षक श्रीमती रितू खोखर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. सांगली संदीप यादव, जिल्हा आरोग्य अधिकारी विजयकुमार वाघ, बालविकास प्रकल्प अधिकारी प.स.जत श्रीमती शकुंतला निकम, तालुका आरोग्य अधिकारी प.स.जत सौ.डॉ. हेमा कांबळे, जिल्हा अध्यक्ष अंगणवाडी संघटना नदिरा नदाफ, तालुका अध्यक्ष आशा सेविका मीना कोळी, तालुका अध्यक्ष अंगणवाडी संघटना माधुरी जोशी, भारुडकार रामभाऊ हेगडे, येरळा प्रोजेक्ट सोसायटीचे प्रा.नारायण देशपांडे तसेच हजारोंच्या संख्येने महिला भगिनी उपस्थित होत्या.ग्रामीण भागातील आरोग्यसेवेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या या कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमाचा गौरव करणारा हा कार्यक्रम विशेष लक्षवेधी ठरला.
कुठल्याही व्यक्तीचे लिंग, जात, धर्म, आर्थिक परिस्थिती न पाहता गोरगरीब जनतेला आरोग्यसेवा पोहोचवण्याचे अतिशय मोलाचे कार्य या भगिनींनी आपल्या हातून साध्य केले आहे. त्यांच्या या अखंडित सेवेची दखल घेत, विक्रम फाऊंडेशनतर्फे सर्व सेविकांना भेटवस्तू देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविका यांच्या अनेक अडचणी आहेत.त्याकडे शासनाने लक्ष द्यावे व त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. या सर्व प्रश्नांना मी विधानसभेत वाचा फोडण्यासाठी प्रयत्नशील राहीन असे आ.विक्रमसिंह सावंत म्हणाले.
जत येथील जतेत‘सलाम तुमच्या कार्याला’सोहळ्यात आशा वर्कर्स,अंगणवाडी सेविकांचा भेटवस्तू देऊन सत्कार करताना आ.विक्रमसिंह सावंत,मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती तृप्ती धोडमिसे व मान्यवर.