जत : जत-सांगली रस्त्यावर वाषाण फाट्याजवळ एसटी- मोटरसायकल यांची समोरासमोर धडक झाली. या जयवंत शिंदे अपघातात जयवंत यशवंत शिंदे (वय ४८, रा. वारणानगर) यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडला. याबाबतची अधिक माहिती अशी, जयवंत शिंदे हे एका खासगी कंपनीत
काम करीत होते. शुक्रवारी काम संपवून ते वारणानगर येथे मोटरसायकलने जात होता.मोटरसायकल (एमएच १० एयू १३१९) वाषाण फाट्याजवळील एका वळणावर आली असता, समोरून सांगलीकडून येणारी एसटी बसची (एमएच १० टीडी ३३०६) मोटरसायकलला जोराची धडक बसली.
मोटरसायकल (एमएच १० एयू १३१९) वाषाण फाट्याजवळील एका वळणावर आली असता, समोरून सांगलीकडून येणारी एसटी बसची (एमएच १० टीडी ३३०६) मोटरसायकलला जोराची धडक बसली.या धडकेत जयवंत यांच्या डोक्याला जबर मार लागून रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची नोंद जत पोलिसांत झाली आहे.