भाऊंना लाभणार मिरज पॅटर्न

0
1

लोकसभेवेळी अपक्षासोबत असलेल्या मिरजेतील कारभाऱ्यांनी मिरज पॅटर्ननुसार यूटर्न घेऊन आगामी विधानसभेला भाऊंसोबत असल्याचे जाहीर केले आहे. मिरजेच्या विकासासाठी निधी आणल्याचे निमित्त करून या सर्वपक्षीय माजी नगरसेवकांनी यूटर्न घेतला आहे. मात्र यूटर्न घेतल्यानंतर खासदारांनी कान पिळल्याने दोन तासातच काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने, मी केवळ भाऊंचे आभार मानले.

मी पाठिंबा दिलाच नसल्याचे घूमजाव केले. तर भाजपच्या बंडखोराने निवडणूक आचारसंहितेपूर्वी निविदा होऊन कामे सुरू झाली नाहीत तर आम्ही वेगळा विचार करू, असा इशारा दिला. यामुळे मिरज पॅटर्नमधील या मंडळीची हौस, मौज पुरविताना भाऊंची चांगलीच दमछाक होण्याची चिन्हे आहेत. आगामी काळात मिरजकरांची मात्र चांगलीच राजकीय करमणुक होणार हे मात्र नक्की.

Team Sanket Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here