जत : मावळत्या विधानसभेत सांगली जिल्ह्यातील दुष्काळी जत तालुक्याचे आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सर्वाधिक २१४ प्रश्न विचारत विधानसभा दणाणून सोडली आहे.आतापर्यत जतचे प्रश्न दाबले जातात हा विषयच आमदार सावंत यांनी खोडून काढला आहे.सक्षम आमदार असेलतर विधानसभेत मतदार संघाच्या समस्या मांडता येतात हे दाखवून दिले आहे.त्याचे सभागृहा बाहेरील आंदोलनेही राज्यभरात चर्चेत राहिली आहेत.
आता मावळत्या विधानसभेत कोणत्या आमदारांनी किती प्रश्न विचारले याचा अभ्यास अहवाल संपर्क या संस्थेने प्रसिद्ध केला.त्यात सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यातून आमदार विक्रमसिंह सावंत यांनी सर्वाधिक २१४ प्रश्न विचारून जतचा आवाज बुलंद केला आहे.तर आ.सुधीर गाडगीळ यांनी विधानसभेत विचारले शून्य प्रश्न तर सुरेश खाडे यांनी खाडे यांनी अवघा एक विचारला आहे.
मावळत्या विधानसभेत आमदारांनी किती प्रश्न विचारले याचा अभ्यास संपर्क या संस्थेने प्रसिद्ध केला. त्यानुसार सांगली जिल्ह्यातील आ सुधीर गाडगीळ यांनी ०, जयंत पाटील २०४, मानसिंगराव नाईक २२, विक्रमसिंह सावंत २१४, विश्वजीत कदम १४१, सुमनताई पाटील १२६, सुरेश खाडे १.
कोल्हापूर जिल्ह्यातील राजेंद्र यड्रावकर यांनी ०, हसन मुश्रीफ १००, प्रकाश आबिटकर ५८, प्रकाश आवाडे १, राजेश पाटील ७५, राजू आवळे ६८, ऋतुराज पाटील १३३, विनय कोरे २३, तर सातारा जिल्ह्यातील दीपक चव्हाण १६४, जयकुमार गोरे ७९, महेश शिंदे ९, मकरंद जाधव २२, पृथ्वीराज चव्हाण १३६, बाळासाहेब पाटील २८, शिवेंद्रराजे भोसले ४, शंभूराज देसाई ० (५ वर्षे मंत्री) असे प्रश्न विचारले आहेत.सांगली जिल्ह्यातून ५३८ तर कोल्हापुरातून ४६७, सातारा जिल्ह्यातून ३५६ प्रश्न विधानसभेत मांडले गेले.
जतचा आवाज बुलंद केला
आमदार विक्रमसिंह सावंत हे विजयी झाल्यापासून सतत जतचे प्रश्न विधानसभेत आक्रमकपणे मांडताना दिसले.विधानसभेच्या पहिल्याच अधिवेशनात नवखा आमदार असतानाही थेट जतच्या समस्या अध्यक्षापुढे मांडल्या होत्या.त्यानंतर झालेल्या जवळपास सर्वच अधिवेशात त्यांनी जतचे अनेक वर्षापासून प्रंलबित प्रश्न पोटतिडकीने मांडून ते प्रश्न सोडवून घेतले आहेत.सभागृहातील त्यांची दोन अगळीवेगळी आंदोलने राज्यात लक्ष वेधून घेणारी ठरली आहेत.
जतबाबत हेटाळणी बंद
राज्यात जतचे नाव घेतले जत दुष्काळ,ऊसतोड मजूराचा तालुका म्हणून होत असलेली हेटाळणी आक्रमक आमदार विक्रमसिंह सावंत यांच्यामुळे बंद झाली असून त्यांनी दुष्काळ संपविण्यासाठी केलेला संघर्ष सर्वश्रुत आहे.म्हैसाळ योजनेतून जत पश्चिम, दक्षिण,उत्तर भागातील गावांना पाणी पोहचविलेच,शिवाय सातत्याने सरकारवर दबाव आणून किंबहुना कर्नाटक सरकारमधील मंत्री महोदयासमोर जत पुर्व भागातील पाणी टंचाईची परिस्थिती मांडून तुबची-बबलेश्वर योजनेतून दरवर्षी पाणी आणून दाखविले आहे.त्यामुळे पुर्व भागातील दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत झाली आहे.
सत्तेत असताना,व सत्तेत नसतानाही त्यांनी जतच्या समस्या लावून धरल्या!
पहिले अडिच वर्षे सत्तेत असताना व नंतरची अडीच वर्षे सत्तेत नसतानाही त्यांनी विकासाचे आपल्या व्हिजननुसार विकासाचे प्रश्न पुर्ण पाच वर्षे लावून धरले.त्यासाठी विधानसभा,जिल्हा,तालुक्यात आंदोलने करून लक्ष वेधले.परिणामी पाच वर्षात जत तालुक्याचे सर्वाधिक प्रश्न सोडविण्याचे भाग्य त्यांना मिळाले.त्यांनी लावून धरलेला जत शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यात यश मिळाले असून दोनच दिवसापुर्वी जत शहरासाठी तब्बल ७७ कोटीची पाणी योजना मंजूर झाली आहे.या योजनेमुळे जतचा पुढील पन्नास वर्षे पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.