महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा पेज कायम असतानाच कॉग्रेसने दुसरी यादी जाहीर करत अनेक जागावर उमेदवार जाहीर करत शिवसेना उध्दव ठाकरे गटाला धक्का दि लिया जे चित्र आहे.शुक्रवारी रात्री काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासोबत बैठक पार पडली. त्यानंतर आज सकाळी काँग्रेस पक्षानं आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत 23 उमेदवारांना स्थान देण्यात आलं आहे.काँग्रेसने विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत ७१ उमेदवार जाहीर केले आहेत. यात पहिल्या यादीत ४८ तर दुसऱ्या यादीत २३ उमेदवारांची नावे आहेत. काँग्रेसने मुंबईत ३ जागांवर उमेदवार दिले आहेत. तर दुसऱ्या यादीत काही नवे आणि जुने चेहरे आहेत.शिरोळमधून गणपतराव पाटलांना उमेदवारी जाहीर
जागा वाटपामध्ये कोल्हापूर दक्षिण, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला आल्याचे स्पष्ट झालं आहे. मात्र, दुसऱ्या यादीमध्येही कोल्हापूर उत्तरचा उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही.
ठाकरे ८०,कॉंग्रेस ७१ पवार ४५ उमेदवार जाहीर
महाविकास आघाडीत तिन्ही पक्षांमध्ये ९०-९०-९० फॉर्म्युला ठरला असल्याचं काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं. आतापर्यंत काँग्रेसनं ७१ तर शिवसेना ठाकरे गटाने ८० उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शऱद पवार गटाकडून ४५ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत.
बबनराव घोलप स्वगृही
माजी मंत्री बबनराव घोलप यांनी आठ महिन्यापूर्वी शिवसेनेच्या (ठाकरे गट) सदस्य पदाचा राजीनामा देऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र, आता बबनराव घोलप यांचे पुत्र माजी आमदार योगेश घोलप यांना देवळाली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळं बबनराव घोलप हे देखील पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. बबनराव घोलप हे रविवारी (27 ऑक्टोबर) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (ठाकरे गट) घरवापसी करणार असल्याचं सांगितलं जातंय.