जत पोलीस ठाण्याचा डोलारा होमगार्डवर | दुय्यम अधिकारी, कर्मचारी सुस्त

0



जत,संकेत‌ टाइम्स : जत पोलीस ठाण्याचा कारभार होमगार्ड संभाळत आहेत.पोलीस ठाणे,रस्त्यावरील सुरक्षा,नाकाबंदी,अगदी अधिकाऱ्यांच्या गाडीत समोरच्या सीटवर होमगार्ड बसत‌ असल्याचे वास्तव चित्र आहे.

 वरिष्ठ अधिकारी नसल्याने दुय्यम अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याला पोलिस चौकी करून ठेवले आहे.





फक्त कमाईकडे लक्ष देणारे दुय्यम अधिकारी व ठिय्या मांडलेले कर्मचारी मनाला वाटेल तसे वागत‌ असून सुस्तावलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यांच्या मुळे सर्व ठिकाणी होमगार्डना कामगिरीवर पाठविले जात आहे.

त्यामुळे एकप्रकारे ठाण्याचा कारभारचं होमगार्डच्या खाद्यावर ठेवल्याचा आरोप होत आहेत.






वरकमाईकडे‌ डोळा 

Rate Card


नाकाबंदी,अवैध धंद्यावर कारवाई करण्यापेक्षा वरकमाईकडे सर्वजण बघत ‌असल्याने ठाण्याचा नावलौकिक धुळीस‌ मिळाला आहे.काही कर्मचाऱ्यांच्या मुळे ठाण्याचे‌ वातावरण गढूळ बनत‌ आहे. नव्याने येत असलेले पोलीस निरिक्षक आप्पासाहेब कोळी यांच्यावर ठाण्यातील मरगळ दूर करून कायदा-सुव्यवस्था सुधारण्याचे मोठे आवाहन असणार आहे.






संकेत टाइम्सच्या बातमीची दखल

जत पोलीस ठाण्याला वरिष्ठ अधिकारी नसल्याने नियंत्रण सुटल्याचे वस्तुनिष्ठ वृत्त गुरूवारच्या अंकात‌ प्रसिद्ध केले होते.यांची जिल्हा पोलीस प्रमुखांनी गंभीर दखल घेत‌ तातडीने पोलीस निरिक्षक म्हणून आप्पासाहेब कोळी यांची नेमणूक केल्याचे‌ वृत्त आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.