बेळोंडगीतील कृषी सहाय्यक,तलाठ्याच्या बदलीची मागणी | ग्रामपंचायतीत ठराव

0जत,संकेत टाइम्स : बेंळोडगी ता.जत येथील कृषी सहाय्यक श्री.कोटी व तलाठी श्री.बामणे यांची बदली करण्याचा ठराव ग्रामपंचायतीच्या बैठकीत घेण्यात आला. या ठरावाला सुचक सुरेश हत्तळी,अनुमोदन जितेंद्र सुतार यांनी दिले,सर्वानुमते हा ठराव मंजूर करत वरिष्ठ कार्यालयाला पाठविण्याचा निर्णय झाला आहे.

या ठरावात म्हटले आहे की.बेळोंडगीला नेमून दिलेला कृषी सहाय्यक श्री.कोटी हे गेल्या चार महिन्यापासून गावाकडे फिरकले नाहीत.


त्यामुळे कृषीशी संबधित ठिंबक सिंचन अनुदान,अतिवृष्ठीमुळे झालेल्या नुकसानीचा शेतकऱ्यांना लाभ मिळालेला नाही.शिवाय अशा नुकसानीचे पंचनामे करण्यात कोटी यांनी केलेल्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.तसेच गावचे तलाठी श्री.बामणे हे बेळोंडगीला येत नाहीत,सोसायटीचे ई करार,वारसा नोंदी,खरेदीदस्त सारखी कामे रखडत आहेत.करजगीतून कारभार चालविणारे तलाठी हे प्रत्येक काम तडजोडीशिवाय करीत नाहीत.

Rate Card

महसूल संदर्भातील कामासाठी करजगीला या,असे सांगतात.अशा दोन्ही बेजबाबदार अधिकाऱ्यांची बदली करण्यात यावे,यासाठी वरिष्ठ कार्यालयाकडे ठराव पाठविण्यात येणार आहे.शिवाय त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करण्याचे या बैठकीत ठरल्याचे पदाधिकाऱ्यां कडून सांगण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.