बेळोंडगी परिसरात विजेचा लपंडाव | पाणी असून पिके लागली वाळू,कारवाईची शेतकऱ्यांची मागणी

0उमदी,संकेत टाइम्स : बोर्गी ता.जत येथील विज उपकेंद्रा अंतर्गत येणाऱ्या बेळोडगी,बोर्गी,करजगी,मोरबगी,माणिकनाळ,आकळवाडी या ग्रामीण भागात पुन्हा एकदा महावितरणच्या कारभारा विरूध्द शेतकऱ्याची ओरड सुरू झाली.असून जाहीर करण्यात आलेल्या वेळे व्यतिरिक्तही शेतीपपाची वीज पुरवठा खंडित होत असल्याने शेतकरी वैतागले आहेत.

विहिरीना व बोअरवेल्सना पाणी असूनही ते विजे अभावी पिकांना देता येत नाही.शिवाय नादुरुस्त रोहित्र लवकर बदलण्यात येत नसल्याने कित्येक दिवस वीज खंडीत‌ राहत आहे.महावितरणने तातडीने कारभार‌ सुधारावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा बेळोंडगी सोसायटीचे चेअरमन सोमलिंग बोरामणी यांनी दिला आहे.उन्हाळ्यात वीज पुरवठ्याचा खेळखंडोबा हे तालुक्यातील ग्रामीण भागासाठी नेहमीचाच झाला आहे. त्यामुळे उन्हाळ्यात कित्येक तास वीज नसणे हे त्यांच्या सवयीचे झाले आहे. परंतु ठरवून नियोजन दिल्याप्रमाणे देखील त्याचा वीज सतत गायब होण्याची समस्या भेडसावू लागल्याने शेतकरी अधिक संतप्त झाला आहे. 

निसर्गांने साथ दिल्याने यंदा‌ विहिरींना व

बोअरला पाणी आहे.परंतु विजेच्या

लपंडावामुळे हे पाणी पिकांना देता येत 

नाही अशी शेतकऱ्यांची अडचण आहे.

Rate Card


ग्रामीण भागात भारनियमनाच्या वेळाही

त्रासदायक असल्याने शेतकऱ्यांना त्या वेळा पाळण्यासाठी दिवस रात्र एक करावा लागतो.या शिवाय रोहित्र नादुरूस्त झाल्यास त्याची त्वरीत दुरूस्ती केली जात नसल्याने किंवा नवीन रोहित्र वेळेवर दिले जात नसल्याने कित्येक दिवस त्याचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागतो. यासदर्भात शेतकऱ्यांनी विद्युत कार्यालयात कितीही खेटा पातल्या तरी फारसा उपयोग होत नसल्याचा अनुभव आहे. जत तालुक्यात नादुरूस्त राहित्रामुळे शेतकऱ्याचे होणारे नुकसान टाळावे,आमच्या संयमाचा अंत‌ बघू नये,असा इशाराही बोरामणी यांनी दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.