दिलासादायक | जत तालुक्यात गुरूवारी तब्बल साडेतीनशे रुग्ण कोरोनामुक्त | दोन मुत्यू | नवे रुग्ण अद्याप शंभरावर
जत,संकेत टाइम्स : जत तालुक्यात तब्बल 349 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत,तर नवे रुग्ण 114 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.तर तालुक्यातील दोघाचा दुर्देवाने मुत्यू झाला आहे.

तालुक्यातील रुग्ण वाढीचा आलेख अखेर हळूहळू खाली येतानाचे चित्र आहे.तालुक्यात सध्या 1298 रुग्णावर उपचार सुरू आहेत.त्यापैंकी 1111 रुग्ण होम आयसोलेशन मध्ये आहेत.गुरूवार अखेरपर्यत तालुक्यातील बाधित रुग्ण संख्या 9132 वर पोहचली असून तब्बल 7912 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
